तसा मी कधीपासुनी तोच होतो
कळेना कुठे सर्व लंपास झाले
किती राहिले नी किती श्वास झाले
प्रसंगाप्रसंगातुनी तेढ आली
क्षणानी क्षणानी जसे तास झाले
सदा तांडवे फक्त परिपक्वतेची
कधी कोवळेसे पदन्यास झाले?
कशाला तुका, माउली, मीर वाचा?
स्वतःला स्वतः जाणले, बास झाले
तुला पाहुनी आजही ओळ झाली
जसे शब्द आले, अनुप्रास झाले
'तुझा मी नि माझीच तू' वाटले... पण
तुला भास झाले, मला भास झाले
तसा मी कधीपासुनी तोच होतो
खरे सांगण्याने अविश्वास झाले
तुझी पावलापावलाला प्रचीती
मला वाटले फक्त आभास झाले
असे तत्त्व नाही तिथे मी असावे
'जुने जून झाले, नवे खास झाले'
मनांना दिला मी दिलासा जरासा
स्वतःच्याचपुरते किती व्यास झाले
तुझा जन्म हा 'बेफ़िकिर' छान गेला
जरी शेवटी शेवटी त्रास झाले
गझल:
प्रतिसाद
क्रान्ति
शुक्र, 14/08/2009 - 19:45
Permalink
सदा तांडवे फक्त
सदा तांडवे फक्त परिपक्वतेची
कधी कोवळेसे पदन्यास झाले?
'तुझा मी नि माझीच तू' वाटले... पण
तुला भास झाले, मला भास झाले
तुझी पावलापावलाला प्रचीती
मला वाटले फक्त आभास झाले
वा! खास गझल!
खलिश
शुक्र, 14/08/2009 - 22:43
Permalink
" तुझी पावलापावलाला
" तुझी पावलापावलाला प्रचीती
मला वाटले फक्त आभास झाले "|
वाह वाह, सहज आणी
सुंदर.
एक शंका:
" असे तत्त्व नाही तिथे मी असावे
'जुने जून झाले, नवे खास झाले' "
ह्यात ` तिथे' च्या जागी " जिथे " रास्त ठरले नसते का ?
` ख़लिश '-वि. घारपुरे/१४-०८-२००९.
भूषण कटककर
शनि, 15/08/2009 - 07:00
Permalink
स्वतःला स्वतः जाणले बास
स्वतःला स्वतः जाणले बास झाले
क्रान्ति व खलिश,
प्रतिसादांनी उत्साह आला.
खलिश,
'जिथे अमुक अमुक नाही, मी असावे' हे हिंदी शैलीचे तर 'अमुक अमुक नाही तिथे मी असावे' हे मराठी शैलीचे आहे. यासाठी तिथे हा शब्द रास्त आहे, जिथे नाही.
धन्यवाद!
आनंदयात्री
शनि, 15/08/2009 - 10:13
Permalink
वा वा... कधी कोवळेसे पदन्यास
वा वा...
कधी कोवळेसे पदन्यास झाले?
फार आवडली ओळ...
बाकीची गझलही आवडली...
शुभेच्छा...
चित्तरंजन भट
रवि, 16/08/2009 - 22:14
Permalink
स्वतःला स्वतः जाणले, बास
वा! चांगली ओळी आणि द्विपदी.
भूषण कटककर
गुरु, 20/08/2009 - 15:42
Permalink
आभार धन्यवाद चित्तरंजन व
आभार
धन्यवाद चित्तरंजन व आनंदयात्री,
आपल्या प्रतिसादांनी उत्साह आला.
ॐकार
रवि, 23/08/2009 - 16:13
Permalink
कशाला तुका, माउली, मीर
कशाला तुका, माउली, मीर वाचा?
स्वतःला स्वतः जाणले, बास झाले
:)
'तुझा मी नि माझीच तू' वाटले... पण
तुला भास झाले, मला भास झाले
वाह!
असे तत्त्व नाही तिथे मी असावे
'जुने जून झाले, नवे खास झाले'
खालची सुटी ओळ खरचं खास आहे, शेर म्हणून मात्र मला अर्थ कळला नाही.