तू जरा समजून घे

शब्द हे मौनातले रे, तू जरा समजून घे
हे असे कोरे बहाणे, तू जरा समजून घे.

हाय जाता जात नाही, धुंद रात तुझ्याविना
मागणे हे चांदण्यांचे, तू जरा समजून घे.

लागले हे सूर आता, मैफिलीस नवे नवे
सप्तकाचे ताल न्यारे, तू जरा समजून घे.

गुंफलेले श्वास सारे, सांगती सगळेच रे
हट्ट येथे गुंतण्याचे, तू जरा समजून घे.

लाट येता भावनांची, थांबवू मजला कसे
ते पुकारे वादळाचे, तू जरा समजून घे.

मोकळी गर्दी करावी, ती तरी भरती हवी
हे शहाणे वेड माझे, तू जरा समजून घे...

प्रज्ञा महाजन

गझल: 

प्रतिसाद

सौ.प्रज्ञाताई,

दीर्घ अक्षराच्या सुटीबाबत माझे मत निरोपातून कळवलेच.

आशय व रदीफ फार आवडले. अनेक ओळी आवडल्या.

आपण खूपच छान गझल केलीत!

अभिनंदन व शुभेच्छा!

नमस्कार,
गझल छान वाटली....
*
हाय जाता जात नाही, धुंद रात तुझ्याविना
मागणे हे चांदण्यांचे, तू जरा समजून घे.

लागले हे सूर आता, मैफिलीस नवे नवे
सप्तकाचे ताल न्यारे, तू जरा समजून घे.
*
(एक शंका : आपण, धुंद रात तु झ्याविना आणी मैफिलीस न वे नवे ह्या शब्दां मधे......त तु ....आणी ....स न...ह्या दोन एक मेकांशी संबंधित
नसलेल्या दोन निर निराळ्या लघूंना एक गुरू मोजले आहेत का?)
` ख़लिश '- विठ्ठल घारपुरे / ३१-०७-२००९.

लाट येता भावनांची, थांबवू मजला कसे
ते पुकारे वादळाचे, तू जरा समजून घे.

वा!

@सहमत...!! मलाही हाच शेर आवडला.

छान.....
हाय जाता जात नाही, धुंद रात तुझ्याविना
मागणे हे चांदण्यांचे, तू जरा समजून घे.

प्रज्ञा
या रचनेतुन तुझ्या मनातल्या वेदना ह्रुदयाला भिदतात.
गझलेतलि तुझि प्रगति कोउतुकास्पद आहे.

छान गझल.
कलोअ
चूभूद्याघ्या

गझ्हल वच्लि. छान आहे. अशय छान जमला आहे.