विठू

पुन्हा एकदा गवस विठू
रित्या अंगणी बरस विठू

दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू

संतसंगती सदा घडो,
अता कुठे ते दिवस विठू ?

नित्य तुझा सहवास हवा
तुलाच करते नवस विठू

तुझ्या दयेचे अमृत दे,
जळते माझी तुळस विठू

घराकडे जा, नको करू
रखुमाईचा विरस विठू

गझल: 

प्रतिसाद

दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू
सुरेख!!

हा शेर आवडला.

मला ही गझल वाटत नाही.

भन्नाट विठू
पुन्हा एकदा गवस विठू
रित्या अंगणी बरस विठू

दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू

संतसंगती सदा घडो,
अता कुठे ते दिवस विठू ?

नमस्कार,
*
दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू
*
हा शेर छान वाटला...
` ख़लिश '/ विठ्ठल घारपुरे/३१-०७-२००९.

गझल आवडली.

आवडली गझल...!! त्यातही हा शेर स्पर्शुन गेला मनाला.
दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू

गझल आवडली.