बहरली मनाची कधी बाग साधी ?

बहरली मनाची कधी बाग साधी ?
न आली तरीही मला जाग साधी !

कश्याला फुलांना अश्या खोल ज़ख्मा ?
न माळ्यास आली तरी जाग साधी !

कधी कंटकानी दिले दंश ओले
कधी पावसाने दिली आग साधी

कधी बुलबुलांनी , कधी ह्या हवेने
दिली खूप प्रेमा मुळे आग साधी

मनाची ` ख़लिश ' मी न सांगी कुणाला
तरी का पसरली अशी आग साधी ?

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / २६-०७-२००९.

गझल: 

प्रतिसाद

राव जिंकलात की?
उत्तम गझल!
कधी पावसाने दिली आग साधी.. व्वा!

आपली ही गझल सुयोग्य गझल आहे असे माझे मत आहे. अभिनंदन!

मनाची खलिश मी न सांगी कुणाला - वा वा! सुंदर!

मान्यवर,
आपण दिलेल्या सूचना आणी प्रोत्साहना मुळे हे शक्य झाले. मी आपला आभारी आहे.असाच लोभ कायम असू द्या.( गझलेंचे नंबर आता टाकणार नाही. )
` खलिश '- विठ्ठ ल घारपुरे/ २७-०७-२००९.

खलिश, ही रचना तंत्रशुद्ध आणि छान आहे. अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

मान्यवर,
आपल्या सर्व सूचनां आणी उत्तेजना मुळेच हे शक्य झाले. मी आपला आभारी आहे.आपला अनुग्रह असाच कायम राहू द्या ही विनंती.
` ख़लिश '-विठ्ठल घारपुरे / २७-०७-२००९ / १८.४३.

वृत्तबद्ध लिखाणाबद्दल अभिनंदन.

कधी कंटकानी दिले दंश ओले
कधी पावसाने दिली आग साधी
सुंदर शेर!! आवडला.

मान्यवर, नमस्कार आणी ह्रदय पूर्वक धन्यवाद.
नियाझमंद,
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे /२७-०७-२००९./२१.१९.

शेर मलाही आवडला!

मान्यवर,
धन्यवाद. आपल्या कडून असेच प्रोत्साहन मिळत राहील अशी आशा आहे.
` ख़ लि श ' - विठ्ठल घारपुरे /२९-७-२००९/२२.१३.

गझल आवडली.

नमस्कार,
म नः पूर्वक धन्यवाद.
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / ३०-०७-२००९.