कशाला फुलांनी

मला नेमके भेटती जे नको ते -

फुलांनी करावा कशाला खुलासा..
जरी चोरला गंध त्यांचा जरासा

मला नेमके भेटती जे नको ते -
कधी पत्र, पत्ता  मिळेना हवासा..

कधी भेट होईल माझी नभाशी?
धरेला मिळू दे सरीचा दिलासा...

मला पाहिजे ते उमगले तरीही
तुझ्यासारखा हा उलटतोच  फासा

किती टाळले मी  तरीही अडकतो
तुझी आठवण आणि ठसका जरासा...

मला टाळते ती नकोसा म्हणून
(तिला सोडुनी दूर जातो हवासा...)

कशाला धरावे तरी  वैर त्याने?
समुद्रापुढे मीन आहे अमासा


-सोनाली जोशी

गझल: 

प्रतिसाद

मला नेमके भेटती जे नको ते -
कधी पत्र, पत्ता  मिळेना हवासा..

कधी भेट होईल माझी नभाशी?
धरेला मिळू दे सरीचा दिलासा...वा वा ...छान शेर.. सहज आलेले

मला टाळते ती नकोसा म्हणूनी.. असे हवे ना? शेवटचे अक्षर गुरु हवे ना?
'फासा' शेर नीटसा स्पष्ट झाला नाही मला..
न चिन्हे इथे फक्त ती.. अर्थ आहे समासा.. ह्या ओळीत ५ मात्रा जास्त आहेत..
ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा-- ह्यात नीट बसत नाहीय..
न चिन्हास त्या... अर्थ आहे समासा.. असे काहीसे म्हणता येईल पण त्याने तुम्हाला अपेक्षित असलेला अर्थ येत नाहीय.. पु.ले.शु.
-मानस६





मानस,
अर्थ पूर्ण समजावा म्हणून लगागा जास्त झाले ते कळलेच नाही:) आता बदल करते आहे.
आणि ओळीचे शेवटचे अक्षर गुरू घ्यायचे असते असा नियम आहे असे वाटले म्हणून तसे ठेवले होते पण ते गुरू करायला हरकत नाही.
सोनाली
म्हणूनी असा बदल करावा आणि शेवटचा शेर काढून टाकावा अशी विश्वस्तांना विनंती.

ओळीचे शेवटचे अक्षर गुरू घ्यायचे असते असा नियम आहे असे वाटले म्हणून तसे ठेवले होते... पण आपण तर लघु ठेवले होते... असो.
-मानस६

सुंदरच...

मला टाळते ती नकोसा म्हणून
(तिला सोडुनी दूर जातो हवासा...)
द बेस्ट....
"अमासा" नवीन शब्द कळला... अर्थ 'क्षुल्लक' असा आहे ना?
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

हवासा आणि सरीचा हे शेर आवडले!!

भन्नाट...
किती टाळले मी  तरीही अडकतो
तुझी आठवण आणि ठसका जरासा...

मला टाळते ती नकोसा म्हणून
(तिला सोडुनी दूर जातो हवासा...)

मला नेमके भेटती जे नको ते -
कधी पत्र, पत्ता  मिळेना हवासा..

मला पाहिजे ते उमगले तरीही
तुझ्यासारखा हा उलटतोच  फासा

मस्तच शेर!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

कधी भेट होईल माझी नभाशी?
धरेला मिळू दे सरीचा दिलासा...
हा शेर विशेश आवडला,
शुभेछा !!!!!

मला नेमके भेटती जे नको ते -
कधी पत्र, पत्ता मिळेना हवासा..
वा! वा!!
कलोअ
चूभूद्याघ्या