इथे तर पानगळ बहरात आहे

ऋतू  न्याराच  ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ  बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच  ह्या जहरात आहे

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?

-----------------------------------------------
जयन्ता५२


 

गझल: 

प्रतिसाद

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच या जहरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य या शहरात आहे...

दोन चांगले शेर! गुडलक...

उगा ना मागती ते घास अर्धा.... ते... !


( या गझलेतील शेरांचा ( मतला सोडून ) नेमका अर्थ लक्षात आला नाही. क्षमस्व! अर्थात, वाचून खूप नादमय वाटले म्हणूनच 'आवडली' असा प्रतिसाद दिला आहे. पण पुन्हा वाचल्यावर अनेक शेर नेमके समजले नाहीत. कृपया राग मानू नये. अर्थ सांगीतल्यास आभारी राहीन )

प्रिय जयन्तजी,

खालील  शेर  आवड्ले....

अभिनंदन.

ऋतू  न्याराच  ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ  बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच  ह्या जहरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?

` ख़लिश ' / २०-०७-२००९./०९.०९.ए.एम.

प्रिय जयन्तजी,

खालील  शेर  आवड्ले....

अभिनंदन.

ऋतू  न्याराच  ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ  बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच  ह्या जहरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?

` ख़लिश ' / २०-०७-२००९./०९.०९.ए.एम.

भूषण,खलिश
धन्यवाद!

जयन्ता५२

वा जयंतराव, जहर, शहर विशेष. गझल छान. आवडली.