जाहले तारे किती ?
भेटलेल्या चांदण्यांना उडविती वारे किती !
पाहिजे होते तयांना नेमके 'घारे' किती ?
सोडुनी शरमेस जेंव्हा घातली जी साद तू..
भेटण्या आतूर मी... पण बंद ती दारे किती !
भक्त मोठा दाविला त्यांनी मला, पण हाय! तो -
मानवाला सोडुनी दगडांस गोंजारे किती !
फासुनी शेंदूर वरती फूलमाळा चढविता...
आंधळ्या-बहिर्यासमोरी लावता नारे किती !
लावले जीवन पणाला अमृताला प्राशण्या;
कोण जाणे त्यातले गोडे किती...? खारे किती ?
फेकली अस्त्रें तयांनी भेदण्या तिमिरांस या...
क्षणभरी ती चमकली... पण जाहले तारे किती ?
गझल:
प्रतिसाद
दर्पण अपंडकर
शुक्र, 17/07/2009 - 09:39
Permalink
गोडे किती...? खारे किती ?
सोडुनी शरमेस जेंव्हा घातली जी साद तू..
भेटण्या आतूर मी... पण बंद ती दारे किती ! अप्रतिम..
फासुनी शेंदूर वरती फूलमाळा चढविता...
आंधळ्या-बहिर्यासमोरी लावता नारे किती !लावले जीवन पणाला अमृताला प्राशण्या;
कोण जाणे त्यातले गोडे किती...? खारे किती ? सुन्दर कल्पना
फेकली अस्त्रें तयांनी भेदण्या तिमिरांस या...
क्षणभरी ती चमकली... पण जाहले तारे किती ?छान शेर आहेत