आश्चर्य काय ती ही आनंदली असावी
आश्चर्य काय ती ही आनंदली असावी
माझ्या कलेवराची ती सावली असावी
आघात लेखणीचा कमजोर का पडावा?
छापून आसवांना ती गंजली असावी
दिसते सभोवती का सारेच लाल रंगी
दृष्टीच आज माझी रक्ताळली असावी
माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
पात्रे कथानकाला कंटाळली असावी
जगणे चवी चवीचे का वाटते नकोसे?
माझीच भूक थोडी मंदावली असावी
शिलगावले कितीदा पण पेटलोच नाही
काडीच ह्या जगाची सर्दावली असावी
बघतेय वाट ती ही आता उजाडण्याची
म्हणुनी निशा जराशी रेंगाळली असावी
हृदयी असूनही ती, अश्रूंत मी बुडालो
हृदयी तिने त्सुनामी सांभाळली असावी
तळटीप : ही गझल 'मराठी गझल' च्या इ-मुश्यायर्यात ऐकता येईल
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 22/06/2009 - 13:59
Permalink
माझीच भूक थोडी मंदावली असावी
जगणे चवी चवीचे का वाटते नकोसे?
माझीच भूक थोडी मंदावली असावी
वा...
आघात लेखणीचा कमजोर का पडावा?
छापून आसवांना ती गंजली असावी
छान. लेखणी छपाईचे काम करत नाही. ते काम बहुधा मुद्रणयंत्राचे, प्रकाशकाचे. ( चूभूद्याघ्या. ) लेखणी लिहिण्याचे काम करते. त्यामुळे इथे छापून चपखल वाटत नाही.छापून ऐवजी खरडून कसे वाटेल?
ज्ञानेश.
सोम, 22/06/2009 - 16:08
Permalink
सुंदर.
हे शेर खूपच छान झालेत-
दिसते सभोवती का सारेच लाल रंगी
दृष्टीच आज माझी रक्ताळली असावी
माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
पात्रे कथानकाला कंटाळली असावी
जगणे चवी चवीचे का वाटते नकोसे?
माझीच भूक थोडी मंदावली असावी
शिलगावले कितीदा पण पेटलोच(पेटलीच?)नाही
काडीच ह्या जगाची सर्दावली असावी
सुंदर. पुलेशु.
क्रान्ति
गुरु, 25/06/2009 - 20:56
Permalink
माझ्या
माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
पात्रे कथानकाला कंटाळली असावी
वा! क्या बात है! गझल आवडली.क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
शांत्सुत
सोम, 29/06/2009 - 15:28
Permalink
खरडून
खरडून आसवांना ती गंजली असावी
छान वाटले असते.
शांत्सुत, एक आनंद यात्री ...
मिल्या
बुध, 01/07/2009 - 14:52
Permalink
धन्यवाद
सर्वांचे खूप आभार...
चित्त : तुम्ही म्हणता ते बरोबर आहे... छापून कुठेतरी (पेपरात वगैरे) छापून येणारे ह्या संदर्भात वापरले होते... खरडून बदल पण चांगला आहे... विचार करतो...
ॐकार
रवि, 05/07/2009 - 19:44
Permalink
कथानक
माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
पात्रे कथानकाला कंटाळली असावी(त)
छान आहे
दशरथयादव
गुरु, 16/07/2009 - 16:47
Permalink
छान बघतेय
छान
बघतेय वाट ती ही आता उजाडण्याची
म्हणुनी निशा जराशी रेंगाळली असावी
भूषण कटककर
गुरु, 16/07/2009 - 18:10
Permalink
मिलिंदराव - छानच गझल!
छान गझल! काही शंका व काही प्रतिसाद! मतप्रदर्शनाची विनंती!
आश्चर्य काय ती ही आनंदली असावी
माझ्या कलेवराची ती सावली असावी - समजला नाही.
आघात लेखणीचा कमजोर का पडावा?
छापून आसवांना ती गंजली असावी - सुरेख
दिसते सभोवती का सारेच लाल रंगी
दृष्टीच आज माझी रक्ताळली असावी - प्रेडिक्टेबल
माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
पात्रे कथानकाला कंटाळली असावी - उत्तम! अतिशय उत्तम शेर!
जगणे चवी चवीचे का वाटते नकोसे? ( चवी चवी 'ने'? )
माझीच भूक थोडी मंदावली असावी - प्रेडिक्टेबल
शिलगावले कितीदा पण पेटलोच नाही
काडीच ह्या जगाची सर्दावली असावी - उत्तम!
बघतेय वाट ती ही आता उजाडण्याची - 'तीही'?
म्हणुनी निशा जराशी रेंगाळली असावी - छान!
हृदयी असूनही ती, अश्रूंत मी बुडालो
हृदयी तिने त्सुनामी सांभाळली असावी - त्सुनामी ... नाही आवडला हा शेर!
अजय अनंत जोशी
शुक्र, 17/07/2009 - 18:43
Permalink
माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
छान गझल.
कलोअ चूभूद्याघ्या
पुलस्ति
शुक्र, 17/07/2009 - 19:09
Permalink
मस्त
पात्रे आणि लेखणी हे शेर आवडले!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शनि, 18/07/2009 - 20:54
Permalink
लै भारी !
शिलगावले कितीदा पण पेटलोच नाही
काडीच ह्या जगाची सर्दावली असावी
मस्त !