नारद

नारदाचे चालले वाल्यापुढे
राम नाही जिंकला धोब्यापुढे

चांगले झाले कधी की वाटते
काय आहे व्हायचे याच्यापुढे?

मी दिले सोडून आताशा मला
व्यर्थ आहे बोलणे माझ्यापुढे

पाहिजे तेव्हा मला घेऊन जा
काय आहे पाहुया त्याच्यापुढे

भेट झाली आपली कोठेतरी
वागले खोटे खरे खोट्यापुढे

नीतिमत्ता या जगाची लोपते
रेशमी नाजूकशा धाग्यापुढे

प्रश्न होता काल, आहे आजही
'व्हायचे तारा कसे' तार्‍यापुढे...




गझल: 

प्रतिसाद

छान...
चांगले झाले कधी की वाटते
काय आहे व्हायचे याच्यापुढे?

मी दिले सोडून आताशा मला
व्यर्थ आहे बोलणे माझ्यापुढे

पाहिजे तेव्हा मला घेऊन जा
काय आहे पाहुया त्याच्यापुढे

भेट झाली आपली कोठेतरी
वागले खोटे खरे खोट्यापुढे

भूषण साहेब,
रचना छान वाटली. सारे च  शे र उत्तम आहेत.
`ख़लिश ' १०-७-२००९.