पुन्हा पुन्हा ते तसेच होते


मनातले या मनात ठेवू, ठरून काही बरेच होते
पुन्हा पुन्हा सावरून घेतो, पुन्हा पुन्हा ते तसेच होते

मनास नाही इलाज काही, उगाच हेवा, उगाच जिद्दी
जरा कुठे गाडले जुने की लगेच काही नवेच होते

कुणाकुणाला दुखावले मी अमोज यादी प्रसार पावे
जिथे जिथे वाट काढली मी, समोर कोणी उभेच होते

प्रसिद्ध होऊन सिद्ध व्हावे, प्रकांडपंडीत नाव व्हावे
अशीच इच्छा असायची हे निदान तुमचे खरेच होते

अता कुणाला कधीच काही म्हणायचे बंद होत आहे
कशास काही म्हणायचे मी? जगात माझे हसेच होते...


गझल: 

प्रतिसाद

हसेच आणि नवेच विशेष!

मा न्य व र, 
आपली  गझल फार आवडली. हे अन युसवल  मीटर सहसा फार खेळवले गेलेल नाही.
सा रे च  शे र छा न आ हे त, प ण  खा ली ल  वि शे ष  आ व ड ले.
मनास नाही इलाज काही, उगाच हेवा, उगाच जिद्दी
जरा कुठे गाडले जुने की लगेच काही नवेच होते
कुणाकुणाला दुखावले मी अमोज यादी प्रसार पावे
जिथे जिथे वाट काढली मी, समोर कोणी उभेच होते
अता कुणाला कधीच काही म्हणायचे बंद होत आहे
कशास काही म्हणायचे मी? जगात माझे हसेच होते...

भू ष ण सा हे ब, मी  मराठी  ग झ ल  ले ख ना त  अ ग दी  न वा आ हे. मी ट् र्स  व र  ज र  का ही
पु स्त के  उ प ल ब्ध  अ स ल्या स  आ प णां स   ती  म ला  सू च व ण्या स  वि नं ती. क्रु प या त्यां चे प्र का श क, वि क्रे ते  आ णी   प्राप्ती  स्था न  ह्यां चे  प त्ते ही  पा ठ वा वे त.
आ प ला,
नि या झ मं द,
`ख लि श ' / ४-७-२००९.
 
 

मनातले या मनात ठेवू, ठरून काही बरेच होते
पुन्हा पुन्हा सावरून घेतो, पुन्हा पुन्हा ते तसेच होते

वा वा! मतला आणि मक्तादेखील अगदी खास!

सगळेच शेर आवडले. सुरेख गझल.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

मतला आणि मक्ता विशेष!
आवडला