धागे
माझे नि तुझे धागे जुळले कधीच नव्हते
रे जीवना, तुला हे कळले कधीच नव्हते
येता वसंत दारी, फुलले पुन्हा निखारे
ग्रीष्मातही अशी मी जळले कधीच नव्हते
मी सोसते अजूनी छळ का तुझ्या व्यथांचा?
माझ्या विवंचनांनी छळले कधीच नव्हते
दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते
डोहात काळजाच्या मी दडविले उसासे
माझे अबोल अश्रू ढळले कधीच नव्हते
मी कालच्या चुकांची चिंता करू कशाला?
ते भोग प्राक्तनाचे टळले कधीच नव्हते
गझल:
प्रतिसाद
काव्यरसिक
शनि, 27/06/2009 - 22:50
Permalink
डोहात
डोहात काळजाच्या मी दडविले उसासे
माझे अबोल अश्रू ढळले कधीच नव्हते
मी कालच्या चुकांची चिंता करू कशाला?
ते भोग प्राक्तनाचे टळले कधीच नव्हते
अप्रतिम!
खूपच छान!
दशरथयादव
सोम, 29/06/2009 - 12:21
Permalink
लेखन
छान...
दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते
ज्ञानेश.
सोम, 29/06/2009 - 12:49
Permalink
छान.
गझल छान.
तुमच्याच इतर गझलांपेक्षा थोडी कमी प्रभावी वाटली.
दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते
इथे एक मात्रा जास्त आहे.
"दारी तुझ्या कशी ही पाऊलखूण माझी?"
कसे वाटेल??
चांदणी लाड.
मंगळ, 30/06/2009 - 14:25
Permalink
मी सोसते अजूनी छळ का तुझ्या व्यथांचा?
संपुर्ण गझल आवडली.
माझे नि तुझे धागे जुळले कधीच नव्हते
रे जीवना, तुला हे कळले कधीच नव्हते मतला सही..!
येता वसंत दारी, फुलले पुन्हा निखारे
ग्रीष्मातही अशी मी जळले कधीच नव्हते मस्तच..
मी सोसते अजूनी छळ का तुझ्या व्यथांचा?
माझ्या विवंचनांनी छळले कधीच नव्हते वा क्या बात है! एकदम खास शेर, फार आवडला!!
मी कालच्या चुकांची चिंता करू कशाला?
ते भोग प्राक्तनाचे टळले कधीच नव्हते सुंदर.
शरद गोरे
मंगळ, 30/06/2009 - 15:21
Permalink
छान
छान
शरद गोरे
मंगळ, 30/06/2009 - 15:23
Permalink
छान
छान.........
दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते
शरद गोरे
मंगळ, 30/06/2009 - 15:25
Permalink
(No subject)
छान.........
दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते
मिल्या
बुध, 01/07/2009 - 14:58
Permalink
छान
पाऊलखूणा आवडल्या
आणि ज्ञानेश ने सुचविलेला बदलही
क्रान्ति
गुरु, 02/07/2009 - 08:53
Permalink
बदल
धन्यवाद ज्ञानेशजी. आपण सुचवलेला बदल मनापासून आवडला. माझ्या मूळ संहितेत मी तो केला आहे. असेच मोलाचे मार्गदर्शन मिळत राहील, याची खात्री आहे.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}