काळजी
जायचे असल्यास जा पण वेळ आहे आंधळी
सोबतीला गंध ने तू, घे, चुरड ही पाकळी
जीवघेण्या वादळाशी झुंजणे नव्हते नवे
बरसणार्या आसवांनी घेतला माझा बळी
पापणी मिटताच अजुनी वाटते दिसशील तू
अजुनही केवळ तुला ती वाट आहे मोकळी
दु:ख विरहाचे तुझ्या कोंडू नये मेघांतरी
शिंपल्यामधुनी पडावे दान माझ्या ओंजळी
चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी
काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी
यापुढे माझी तुझी अन् काळजीही वेगळी
गझल:
प्रतिसाद
सोनाली जोशी
शुक्र, 22/05/2009 - 16:14
Permalink
वा
काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी
यापुढे माझी तुझी अन् काळजीही वेगळी
हा शेर अतिशय आवडला.
ज्ञानेश.
शुक्र, 22/05/2009 - 17:19
Permalink
चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा...
सुंदर गझल आहे. पुन्हा पुन्हा गुणगुणावी अशी.
जीवघेण्या वादळाशी झुंजणे नव्हते नवे
बरसणार्या आसवांनी घेतला माझा बळी
सुरेख.
पापणी मिटताच अजुनी वाटते दिसशील तू
अजुनही केवळ तुला ती वाट आहे मोकळी
या शेरात 'केवळ' शब्द 'तुला' साठी आहे की वाटेसाठी? मला वाटते- आजही तुला केवळ ती वाट मोकळी आहे असा भावार्थ आहे. असे असल्यास दुसर्या ओळीची पुनर्रचना करावी लागेल.
चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी
मला सर्वाधिक आवडलेला शेर!
काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी
यापुढे माझी तुझी अन् काळजीही वेगळी
यातही पुन्हा 'अन' ची जागा चुकल्यासारखे वाटते. माझी-तुझी च्या मध्ये अन पाहिजे होता. (अर्थाच्या दृष्टीने. वृत्त निर्दोष आहेच.)
धन्यवाद.
पुलस्ति
शुक्र, 22/05/2009 - 18:50
Permalink
छान!
दु:ख आणि पापणी हे शेर आवडले! (पापणी आणि अन बद्दल ज्ञानेशशी सहमत)
सोबतीला गंध ने तू, घे, चुरड ही पाकळी; चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा; काळजी तू सोड माझी, घे स्वतःची तेवढी ... हे सुटे मिसरेही फार सुंदर आहेत!!
क्रान्ति
शुक्र, 22/05/2009 - 20:52
Permalink
सुंदर!
गझल आवडली. खास शेर
दु:ख विरहाचे तुझ्या कोंडू नये मेघांतरी
शिंपल्यामधुनी पडावे दान माझ्या ओंजळीक्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
शितल
शनि, 23/05/2009 - 17:16
Permalink
सुंदर..
प्रत्येक शेर सुंदर..:)
चक्रपाणि
शुक्र, 29/05/2009 - 22:30
Permalink
असेच म्हणतो
- चक्रपाणि जीवन चिटणीस
आनंदयात्री
रवि, 31/05/2009 - 13:21
Permalink
सोनाली,
सोनाली, ज्ञानेश, चक्रपाणि, शीतल, पुलस्ति, क्रांति
सर्वांना धन्यवाद...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!
चित्तरंजन भट
शुक्र, 05/06/2009 - 10:54
Permalink
चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी
छान!
आनंदयात्री
गुरु, 18/06/2009 - 16:31
Permalink
धन्यवाद
धन्यवाद चित्तजी...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!
मिल्या
बुध, 01/07/2009 - 14:30
Permalink
मस्त
पोकळी शेर खूप आवडला...
ॐकार
रवि, 05/07/2009 - 19:42
Permalink
पोकळी
चल अता विसरून जाऊ एकमेकांच्या खुणा
चल अता ओढून घेऊ आतमध्ये पोकळी
लक्षवेधी आहे, खासकरून पोकळी शब्द शेवटी येताना सगळा अर्थ घेऊन येतो :)