शब्दाना अडवीत गेले.
ही वाट तुझ्या स्वप्नांची आशेने तुडवित गेले
अन रंग तुझ्या प्रीतीचे अंगावर उडवित गेले.
त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवित गेले.
वेदना कधी ना दिसली ना कधी उसासे कळले
हास्याच्या पडद्यामागे मी अश्रू दडवित गेले.
जे जाणवले तुज नाही ते शब्द कोरडे झाले
दु:खाच्या भरल्या डोही मी मलाच बुडवित गेले.
जे नव्ह्ते माझ्यासाठी ते माझे म्हणूनी जपले
जेव्हा मज कळले तेव्हा शब्दांना अडवित गेले.
नीता आम्बेगावकर

गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
बुध, 22/04/2009 - 18:25
Permalink
जे नव्ह्ते
जे नव्ह्ते माझ्यासाठी ते माझे म्हणूनी जपले
जेव्हा मज कळले तेव्हा शब्दांना अडवित गेले.
फार आवडला...
एक शंका - सगळे काफिये 'वित'च्या ऐवजी 'वत' असे का केले नाहीत? उदा. अडवत, बुडवत इ.
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!
दशरथयादव
गुरु, 23/04/2009 - 14:25
Permalink
भन्नाट..... त
भन्नाट.....
त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवित गेले.
वेदना कधी ना दिसली ना कधी उसासे कळले
हास्याच्या पडद्यामागे मी अश्रू दडवित गेले.
जे जाणवले तुज नाही ते शब्द कोरडे झाले
दु:खाच्या भरल्या डोही मी मलाच बुडवित गेले.
जे नव्ह्ते माझ्यासाठी ते माझे म्हणूनी जपले
जेव्हा मज कळले तेव्हा शब्दांना अडवित गेले.
नीता
शुक्र, 24/04/2009 - 11:24
Permalink
नमस्कार
नमस्कार 'आनन्दयात्री',
माझ्या गझलेबद्दलचे तुमचे मत मी वाचले. माझी ही गझल कै. श्री. सुरेश भट यानीच निवडली आहे. त्यानीच माझ्या गझलेवर सन्स्कार केले आहेत. 'अडवत्','बुडवत' हे शब्द बोली भाषेत ठीक वाटतात. पण आपण जसे बोलतो तसेच प्रत्येक वेळी लिहित नाही. मुळात 'अडवणे' हा शब्द 'अडविणे' असाच लिहिला जातो. त्यामुळे त्यानी ते शब्द तसेच ठेवले असतील. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पुलस्ति
शनि, 25/04/2009 - 04:36
Permalink
छान!
गझल छान आहे. शेवटचा शेर विशेष आवडला!
अजय अनंत जोशी
रवि, 26/04/2009 - 21:00
Permalink
आयुष्य उधळले ...
त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवित गेले.
हे आवडले
कलोअ चूभूद्याघ्या
शांत्सुत
शुक्र, 12/06/2009 - 13:52
Permalink
ग्र् ट
ग्र् ट
इलोवेमे
शनि, 13/06/2009 - 14:35
Permalink
nice
very nice thoughts nita just giving the emtional erruptions.
मानस६
शनि, 13/06/2009 - 18:08
Permalink
.नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवित गेले
त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवित गेले.
वेदना कधी ना दिसली ना कधी उसासे कळले
हास्याच्या पडद्यामागे मी अश्रू दडवित गेले.
जे जाणवले तुज नाही ते शब्द कोरडे झाले
दु:खाच्या भरल्या डोही मी मलाच बुडवित गेले... वा... हे सर्व शेर भावस्पर्शी आहेत..
की नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवित गेले?.. असा प्रश्नार्थक 'टोन' दिल्यास जास्त परिणामकारक होईल काय, असा विचार करतोय.. पु. ले.शु.
-मानस६