करार
माझे कधी तुझ्याशी काही करार होते
तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते
श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते
वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते
वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली
काळोख पांगताना उघडेच दार होते
हातून सावलीचा निसटून हात गेला,
आयुष्य फाटलेले मी सांधणार होते
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
रवि, 31/05/2009 - 13:24
Permalink
सुटे मिसरे
सुटे मिसरे जास्त आवडले -
वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते....
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!
जयश्री अंबासकर
मंगळ, 09/06/2009 - 13:53
Permalink
श्वासासवे
श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते........अहाहा....मस्तच :)
दशरथयादव
मंगळ, 09/06/2009 - 13:58
Permalink
भन्नाट श्व
भन्नाट
श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते
चांदणी लाड.
सोम, 15/06/2009 - 12:01
Permalink
तू मोड जीवना
@मतला फारच आवडला..!!
माझे कधी तुझ्याशी काही करार होते
तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते.
श्रीवत्स
बुध, 26/08/2009 - 15:22
Permalink
उत्तम गझल
उत्तम गझल
आनंदयात्री
बुध, 26/08/2009 - 22:56
Permalink
पुन्हा वाचली... पुन्हा
पुन्हा वाचली...
पुन्हा आवडली... डोक्यात घोळताहेत शेर, म्हणून पुन्हा reply...
वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते
वावा...
पुलेशु..
भूषण कटककर
बुध, 02/09/2009 - 21:49
Permalink
सन्माननीय क्रान्तीजी, आपल्या
सन्माननीय क्रान्तीजी,
आपल्या या गझलेतील शेवटचा शेर 'अफाट' आहे याची आपल्याला सार्थ जाणीव असणारच अशी नम्र अपेक्षा! अप्रतिम शेर!
काही विरामचिन्हे गेलात विसरुनी का?
म्हणली गझल मला, "मी शृंगारणार होते"
सविनय
-बेफिकीर!