खेळ !

...............
खेळ  !
...............


कुणाचा तरी भास झाला !
सुगंधी किती श्वास झाला !

अकस्मात जवळीक झाली...!
दुरावा अनायास झाला !!

खरे तेच खोटे निघाले...
अविश्वास विश्वास झाला !

कुणाचा तरी जीव  येथे...
कुणाचा तरी घास झाला !

बुडे कोण राजीखुषीने ?
किनाराच लंपास झाला !

तुलाही दिल्या वेदना मी...
मलाही तुझा त्रास झाला !

तसा जन्म गेला न वाया...
तसा खेळ हा खास झाला !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

हे  शेर  आवडले-
कुणाचा तरी भास झाला !
सुगंधी किती श्वास झाला !

अकस्मात जवळीक झाली...!
दुरावा अनायास झाला !!

कुणाचा तरी जीव  येथे...
कुणाचा तरी घास झाला !

तुलाही दिल्या वेदना मी...
मलाही तुझा त्रास झाला !

अतिशय आवडली गझल.

प्रदीप : अख्खी गजल जबरदस्त........ मतला अप्रतीम

जबरदस्त गझल! सगळेच शेर एकसे बढकर एक!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

बुडे कोण राजीखुषीने ?
किनाराच लंपास झाला !

तुलाही दिल्या वेदना मी...
मलाही तुझा त्रास झाला !
जबरदस्त...
"लंपास" हा काफिया फार आवडला...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

अकस्मात जवळीक झाली...!
दुरावा अनायास झाला !!
वा! छान गझल.

मस्तच !! सगळेच शेर एकदम जबरी !!