धाड....
उंच कोठे ताड मी...
वाकलेले झाड मी...
जेवतो मी भूक अन्
तो म्हणे खादाड मी...
कोंडले खोलीतही..
पुरवलेही लाड मी...
किर्र जंगल तू सखे..
अन् किती ओसाड मी...
काय संपत्ती तुझी..!
सांग टाकू धाड मी...?
मी "कर" असतो तर...
गझल:
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते !
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !
उंच कोठे ताड मी...
वाकलेले झाड मी...
जेवतो मी भूक अन्
तो म्हणे खादाड मी...
कोंडले खोलीतही..
पुरवलेही लाड मी...
किर्र जंगल तू सखे..
अन् किती ओसाड मी...
काय संपत्ती तुझी..!
सांग टाकू धाड मी...?
मी "कर" असतो तर...
प्रतिसाद
कर असतो तर...
बुध, 27/05/2009 - 19:24
Permalink
अनुस्वार..
अनुस्वार कसा द्यावा...
कृपया मार्गदर्शन करावे....
विश्वस्त
बुध, 27/05/2009 - 22:30
Permalink
असे
http://www.sureshbhat.in/node/21 ह्या दुव्यावर बघा. माहिती दिली आहे. अनुस्वार देण्यासाठी M किंवा .n वापरावे. उदा. जंगल लिहिण्यासाठी ja.ngala किंवा jMgala हे पर्याय आहेत.
कर असतो तर...
गुरु, 28/05/2009 - 12:47
Permalink
आभारी....
ह्या इथे अनंग रंग रास रंगला..
गोपगोपिकांसवे मुकूंद दंगला...
जमले बरोबर...
धन्यवाद...
विश्वस्थ साहेब...
चित्तरंजन भट
गुरु, 28/05/2009 - 17:47
Permalink
अभिप्राय
किर्र जंगल तू सखे..
अन् किती ओसाड मी
वा. ..
मी भूक जेवतो आहे ही कल्पना छान आहे.
कोंडले खोलीतही..
पुरवलेही लाड मी...
छान. पण काय, कुणाला खोलीत कोंडले? मला म्हणायचे असावे. मी रदीफ असल्यामुळे ह्या शेरात मिसगाइड होत असावे. शेवटी चूभूद्याघ्या.
क्रान्ति
गुरु, 28/05/2009 - 21:25
Permalink
मस्त!
मस्त गझल!
किर्र जंगल तू सखे..
अन् किती ओसाड मी
खूपच खास.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
आनंदयात्री
रवि, 31/05/2009 - 13:28
Permalink
किर्र जंगल
किर्र जंगल तू सखे..
अन् किती ओसाड मी...
छानच...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!