कविता
वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता
"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?
गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता
उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शनि, 23/05/2009 - 00:12
Permalink
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!
पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!
क्या बात है.
वाव्वा, सुरेख गझल! ३रा शेर सोडल्यास फार फार आवडली. अभिनंदन
सोनाली जोशी
शनि, 23/05/2009 - 01:49
Permalink
वा
अप्रतिम गझल. फार आवडली.
सोनाली
क्रान्ति
शनि, 23/05/2009 - 07:32
Permalink
सुरेख!
सुरेख गझल.
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!
मस्तच!!!!!!!!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
दशरथयादव
शनि, 23/05/2009 - 14:11
Permalink
शेर
शेर आवडले...
"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?
गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता
उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?
प्रदीप कुलकर्णी
शनि, 23/05/2009 - 21:58
Permalink
सु रे ख...
वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता
- छान. शेवटी वेड्याचं घर उन्हातच! :)
"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?
वा... वा... सुंदर!
गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता
सु रे ख...
उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?
मस्त...
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
अप्रतिम...
पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!
झकास
खूप छान झाली आहे ही कवितेवरील गझल! मनापासून शुभेच्छा.
योगेश वैद्य
रवि, 24/05/2009 - 14:36
Permalink
अगदी खरं
प्रदीप म्हणतो तसंच,आवडली पुलस्ति.
ज्ञानेश.
सोम, 25/05/2009 - 09:55
Permalink
अमेझिंग!
पुलस्ति,
नेहमीप्रमाणेच दर्जेदार गझल.
"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?
सुंदर.
उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?
मला वाटते, राहिल... :)
कळतो अजून रोजच मीही मला नव्याने
कळलीच पाहिजे का एका दमात कविता?
पटवू तुला कसे... पण पटवू तरी कशाला?
आहे; अजून आहे माझ्यातुझ्यात कविता!
Amazing!
पुलस्ति
बुध, 03/06/2009 - 19:37
Permalink
धन्यवाद
प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद!