वारसा

घाव घालुन मीठ त्यावर चोळण्याचा
हाच होता रोख त्याच्या बोलण्याचा

क्रूरतेला राहिली सीमा न काही
छंद त्याला सावजाशी खेळण्याचा

मंदिराची देणगी ही लाच 'त्या'ला,
की तराजू पापपुण्ये तोलण्याचा?

जीवघेणा खेळ आता सोड वेड्या,
कोवळ्या, ताज्या कळ्यांना जाळण्याचा

उंच जाताना न होते भान याचे,
झोकही जाईल फिरत्या पाळण्याचा!

"आज मी कामात आहे, तू उद्या ये"
रोजचा त्याचा बहाणा, टाळण्याचा

तू नको घेऊस ध्यानी,  मीच घेते
वारसा खाणाखुणा सांभाळण्याचा!

 

गझल: 

प्रतिसाद

सुंदरच.
कलोअ चूभूद्याघ्या

उंच जाताना न होते भान याचे,
झोकही जाईल फिरत्या पाळण्याचा!.. वा वा!

तू नको घेऊस ध्यानी,  मीच घेते
वारसा खाणाखुणा सांभाळण्याचा!.. बहोत बढिया!
चांगली गझल!
-मानस६

झोक शेर फार आवडला!

शेर आवडले
क्रूरतेला राहिली सीमा न काही
छंद त्याला सावजाशी खेळण्याचा
उंच जाताना न होते भान याचे,
झोकही जाईल फिरत्या पाळण्याचा!
"आज मी कामात आहे, तू उद्या ये"
रोजचा त्याचा बहाणा, टाळण्याचा
तू नको घेऊस ध्यानी,  मीच घेते
वारसा खाणाखुणा सांभाळण्याचा!