बोलका

स्पर्श फार बोलका असे तुझा
लांबुनीच तोडगा असे तुझा


मानवास बांधले पशूसवे
कोण यात वेगळा असे तुझा ?


काल ठेवले उगाच तू घरी
वेदनेस त्रास हा असे तुझा


आज चिंब पावसात होवुया
नेहमीच अश्रु का असे तुझा ?


मी निमित्तमात्र गात राहिलो
राग, श्वास अन गळा असे तुझा


लाज तोंड उघडण्यास वाटु दे
चेहराच बोलका असे तुझा

गझल: 

प्रतिसाद

"कोण यात वेगळा असे तुझा ?"
अर्थ नाही कळला... आणि उला मिसर्‍याशी नातं ही नाही कळलं...

मी निमित्तमात्र गात राहिलो
राग, श्वास अन गळा असे तुझा
वावा....
ही स्वरयमकाची गझल ना?

 
चुभूद्याघ्या... *********************** वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

धन्यवाद आनंदयात्री,
मानव आणि पशूला एकत्र बांधले तर यात तुझा असा वेगळा कोण आहे?
दोन प्रश्न आहेत : तुझ्याहून वेगळा कोण आहे? आणि तुझ्यासाठी वेगळा कोण आहे?
उत्तर : तुझ्यासाठी दोन्ही एकच आहेत.
कलोअ चूभूद्याघ्या

ही स्वरयमकाचीच गजल आहे.
कलोअ चूभूद्याघ्या