काय करावे आता?
दांभिक ही दुनिया सारी,
कोणास आपले म्हणावे आता?
हजार प्रश्न उभे राहती समोर,
कशास उत्तर द्यावे आता?
शोधले की सापडले म्हणतात,
पण शोधायचे कसे सांगा आता?
खरे कोणते नि खोटे कोणते?
कशावर विश्वास ठेवावा आता?
गोंधळात टाकती सारे जण,
कसे यातून बाहेर यावे आता?
प्रेमाच्या दिसती निरनिराळ्या परिभाषा,
खरे प्रेम कशास म्हणावे आता?
जाळेच हे वाढतच जाणार,
उमगेल तेवढेच घ्यावे आता.
.....आरती कदम
गझल:
प्रतिसाद
दशरथयादव
शनि, 25/04/2009 - 13:45
Permalink
आरती ,
आरती ,
कविता तुझ्या मनात आहे चान्गली...ती कागदावरही आणखी उतरायला हवी असे वाटते...
दांभिक ही दुनिया सारी,
कोणास आपले म्हणावे आता?.... छान