मनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी

अजून सलतो जुनाच काटा जरी कुठे ना फिरले तरी

कुठे छळाचा नसे पुरावा  असे समंजस घर देखणे
सकाळ होता सजून बसते कमी अधिक घडले तरी    

 विझेल  अग्नी  कधी बरे हा? इथे कुणाची  जळते चिता?
(अजून बाकी  कसा निखारा शहर कधीचे जळले तरी?)

जगून घेते मनाप्रमाणे सुखास लावेल नजर कुणी
तसे अचानक छळून जाती विचार रात्री कुठले तरी

मनास देते प्रकाश माझ्या अजून आशा तगते इथे..
कुठून येते  निराश  वारे  विषण्ण वादळ सरले  तरी

मला नकोशी  उमलत जाते मनात माझ्या कविता कधी..
कशी  नकोश्या मुलाप्रमाणे बळावते ती  कळले तरी .......
- सोनाली जोशी

गझल: 

प्रतिसाद

सुंदर  गझल.
मोठे  वृत्त  असूनही  सहजसुंदर  हाताळणी.
मनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी
अजून सलतो जुनाच काटा जरी कुठे ना फिरले तरी

कुठे छळाचा नसे पुरावा  असे समंजस घर देखणे
सकाळ होता सजून बसते कमी अधिक घडले तरी    

मनास देते प्रकाश माझ्या अजून आशा तगते इथे..
कुठून  येती निराश  वारे  विषण्ण वादळ सरले  तरी

शुभेच्छा.

संपूर्ण गझल आवडली.
जगून घेते मनाप्रमाणे सुखास लावेल नजर कुणी
तसे अचानक छळून जाती विचार रात्री कुठले तरी  

मनास देते प्रकाश माझ्या अजून आशा तगते इथे..
कुठून येते  निराश  वारे  विषण्ण वादळ सरले  तरी

मला नकोशी  उमलत जाते मनात माझ्या कविता कधी..( वा..!! हे तर फारच आवडले.)
कशी  नकोश्या मुलाप्रमाणे बळावते ती  कळले तरी .......

मनास देते प्रकाश माझ्या अजून आशा तगते इथे..
कुठून येते  निराश  वारे  विषण्ण वादळ सरले  तरी

कलोअ चूभूद्याघ्या

अजून बाकी  कसा निखारा शहर कधीचे जळले तरी?
काबिले तारिफ !!

प्रसन्न शेंबेकर
 "तुझी जागण्याची अदा पाहिली

फुले आरतीला उभी राहिली"

घर देखणे...छान
कुठे छळाचा नसे पुरावा  असे समंजस घर देखणे
सकाळ होता सजून बसते कमी अधिक घडले तरी    

 विझेल  अग्नी  कधी बरे हा? इथे कुणाची  जळते चिता?
(अजून बाकी  कसा निखारा शहर कधीचे जळले तरी?)

जगून घेते मनाप्रमाणे सुखास लावेल नजर कुणी
तसे अचानक छळून जाती विचार रात्री कुठले तरी

मनास देते प्रकाश माझ्या अजून आशा तगते इथे..
कुठून येते  निराश  वारे  विषण्ण वादळ सरले  तरी

सर्व गझल आवडली...
कुठे छळाचा नसे पुरावा  आणि जगून घेते मनाप्रमाणे  हे आवडले... शेवटचा शेर पण
तुमच्या गझलांमधे जो feminine flavour जाणवतो तो आवडतो मला.... बहुतेक गझलकार पुरुष असल्याने हे अभावाने जाणवते बाकीच्यांच्या गझलेत...
 
सर्वांच्या प्रतिसादाकरता धन्यवाद. यामधले २-३ शेर नक्कीच अजून चांगले , सफाईदार होऊ शकतील असे मला वाटते. पण वृत्तात लिहितांना एवढी शब्दसंपत्ती आणि वृत्तावर पकड नाही या दोन्ही गोष्टी जाणवल्या. आणखी प्रयत्न करेन.
सोनाली

गझल आवडली. शेवटचा शेर विशेष. वृत्तही हळूहळू जमते आहे. :-)

आफरीन्......बहोतखूब....
` khalish ' Ahmedabad/ 19-06-2009.