चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..

पूर आले ,सोसली मी वादळेही ,वाढलो मी
घाव भरले, पण फळांचा भार झाला वाकलो मी

या जगाच्या कौतुकाने केवढा  आनंदलो मी
 चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..

सोडल्याने देश माझी चालली फरफट कधी ची
बाप माझा सांगतो की वैभवाने माजलो मी

घेतले घरदार त्यांनी, घेतले सोने कुणी , पण
राहिली ही माय माझ्या वाटणीला....जिंकलो मी

मानली ना हार केव्हा,   घेतला मी  वेळ थोडा
गप्प होतो, काळ आला योग्य मग घोंघावलो मी

कैक वर्षांनी बघितले बाल्य माझे अंगणात
खेळतांना नातवाला ना कधी रागावलो मी....

-सोनाली जोशी
गझल: 

प्रतिसाद

या जगाच्या कौतुकाने केवढा  आनंदलो मी
 चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..
वाव्वा... फार आवडले.

घेतले घरदार त्यांनी, घेतले सोने कुणी , पण
राहिली ही माय माझ्या वाटणीला....जिंकलो मी
आवडले. तुम्हारे पास क्या है, मेरे पास माँ है लगेच आठवले.

एकंदर छान झाली आहे.

चन्द्र झालो...
लय्..जड वाटते
या जगाच्या कौतुकाने केवढा  आनंदलो मी
 चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..

सोडल्याने देश माझी चालली फरफट कधी ची
बाप माझा सांगतो की वैभवाने माजलो मी

सुरेख  आहे  गझल.
हे  दोन्ही  शेर  फार  आवडले.
सोडल्याने देश माझी चालली फरफट कधी ची
बाप माझा सांगतो की वैभवाने माजलो मी

घेतले घरदार त्यांनी, घेतले सोने कुणी , पण
राहिली ही माय माझ्या वाटणीला....जिंकलो मी

तसेच-
कैक वर्षांनी बघितले बाल्य माझे अंगणात
नातवाला खेळतांना ना कधी रागावलो मी....

हा  शेरही  वैशिष्ट्यपूर्ण  आहे.
शुभेच्छा.

या जगाच्या कौतुकाने केवढा  आनंदलो मी
 चंद्र झालो मी कुणाचा अन किती डागाळलो मी..
व्वा!

कलोअ चूभूद्याघ्या

सोडल्याने देश माझी चालली फरफट कधी ची
बाप माझा सांगतो की वैभवाने माजलो मी

सुंदर शेर् !

पूर आले ,सोसली मी वादळेही ,वाढलो मी
घाव भरले, पण फळांचा भार झाला वाकलो मी

कैक वर्षांनी बघितले बाल्य माझे अंगणात

नातवाला खेळतांना ना कधी रागावलो मी....

सुरुवात व शेवट यांच्यामधलं रिलेशन आवडलं!



फक्त मला असं वाटतं-
कैक वर्षांनी बघितले बाल्य माझे अंगणात

नातवाला खेळतांना ना कधी रागावलो मी....

या शेराची रचना जरा घाईत झालीये....
आशय छानच आहे पण शब्दा-छंदावरची कमांड-

"घेतले घरदार त्यांनी, घेतले सोने कुणी , पण
राहिली ही माय माझ्या वाटणीला....जिंकलो मी"

-यासारखी असती तर अजून मजा आली असती!
अजून जास्त इम्पॅक्ट झाला असता!


सोडल्याने देश माझी चालली फरफट कधी ची
बाप माझा सांगतो की वैभवाने माजलो मी
फार आवडला... मार्मिक आहे...
मानली ना हार केव्हा,   घेतला मी  वेळ थोडा
गप्प होतो, काळ आला योग्य मग घोंघावलो मी
वावा....
शुभेच्छा...

सगळेच शेर आवडले.
चंद्राचा शेर एकदम चांद जैसा!
जयन्ता५२
 
 
जयन्ता५२

चंद्र शेर आवडला...

मतल्यानेच बाजी मारली आहे. 'चंद्राचा' शेरही खूपच छान!
 

कैक वर्षांनी बघितले बाल्य माझे अंगणात
खेळतांना नातवाला ना कधी रागावलो मी....
सुरेख शेवट , छानच !

कैक वर्षांनी बघितले बाल्य माझे अंगणात
खेळतांना नातवाला ना कधी रागावलो मी....

सुरेख शेवट , छानच !