आसवे


आज नयनी पुन्हा जागली आसवे
भंगली शांतता वाजली आसवे

लोक जातात नयनांवरी कोरड्या
हाय दिसती कुठे आतली आसवे

तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे

जाहलो मी अता आसवांची कबरमी
मला खोडुनी गाडली आसवे

ही गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे

-- वैभव देशमुख

प्रतिसाद



हे शेर फारच उत्तम आहेत.
 
तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे


 


आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे


 


जाहलो मी अता आसवांची कबरमी
मला खोडुनी गाडली आसवे

गझल आहे ही!
कुठला शेर सांगावा.. सर्वच शेर एकापेक्षा एक आहेत!!

तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे
छान...

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे
ओहोहो...सुंदर कल्पना. फारच छान.

ही गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे
अतिशय सुरेख....
फार फार आवडले हे शेर...गझललेखनासाठी अगदी मनापासून शुभेच्छा.


 

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे
ही गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे
सर्वच शेर खुपच सुरेख आहेत...!
मी तर वैभवच्या गझलांचा  चाहता आहे. त्याची '....फुलान्चा रस्ता' गझल तर अप्रतिम आहे...
खुप दिवसांनी त्याची गझल वाचयल मिळाली......
दोस्त तु लिहित'च' रहा...
तुझ्या लिखनासाठी शुभेच्छा ...!
 
 

ZAAAAAKAAAAAAAS
BEST OF YOUR FUTURE

WA KY BAT HAI

-- वैभव देशमुख

कुठला शेर सांगावा.. सर्वच शेर एकापेक्षा एक आहेत!!

दोस्त तु लिहित'च' रहा...

भन्नाट....
तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे

जाहलो मी अता आसवांची कबरमी
मला खोडुनी गाडली आसवे