राजसा
Posted by नितीन on Wednesday, 9 May 2007
जाहलो मी का असा?
सांग ना रे राजसा
भंगला का चेहरा?
भंगलेला आरसा!
ते निघाले लोक का?
बोललो ना फारसा
काय खोटे बोललो?
बोललो आहे जसा
तू नको सांगू मला
सोडण्या हा ही वसा!
गझल:
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
बुध, 09/05/2007 - 14:48
Permalink
सूचना
जाहलो मी का असा?
सांग ना रे राजसा
मत्ल्यात फक्त दोन विधाने आहेत, कविता दिसायली हवी.
भंगला का चेहरा?
भंगलेला आरसा!
या शेरात प्रथम तुम्ही प्रश्न विचारताय, त्याचे उत्तर (तसे काहीसे) दुस-या ओळीत अपेक्षित आहे. भंगलेला आरसा वरून काही स्पष्ट होत नाही.
रचना गझलेचे सर्व नियम पाळून ही गझल वाटत नाही. माफ करा हे तुम्हाला दु:ख देणारे असले तरी मला असेच वाटते.
चित्तरंजन भट
बुध, 09/05/2007 - 16:45
Permalink
भंगलेला चेहरा!
समीर चव्हाण यांच्याशी बराचसा सहमत असलो तरी तुमचे प्रयत्न योग्य दिशेन होत आहेत असे वाटते. छोट्या वृत्तात लिहिताना दोन ओळींत घट्ट प्रस्थापित करताना कधी कधी बरीच मेहनत करावी लागते.
भंगलेला चेहरा!
भंगला का आरसा?असे केले तर?
समीर, प्रामाणिक प्रतिसादही प्रोत्साहन देणारे असू शकतात. तसा प्रयत्न करावा, ही विनंती.
समीर चव्हाण (not verified)
बुध, 09/05/2007 - 17:18
Permalink
लक्षात ठेवीन
चित्तरंजन यापुढे मी हे लक्षात ठेवीन. कधी-कधी भावनेच्या भरात असं होतं. माझं चुकलंच.
प्रणव सदाशिव काळे
गुरु, 10/05/2007 - 08:00
Permalink
काय खोटे बोललो?
काय खोटे बोललो?
बोललो आहे जसा
आवडले. इतर वाक्येही आवडली. छोट्या वृत्तात लिहिण्याचे आव्हान आवडले.
नितीन
गुरु, 10/05/2007 - 19:06
Permalink
आभार
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार!
भंगला का चेहरा?
भंगलेला आरसा!
या
ओळींतून असे सुचवायचे आहे की- माझे जे वागणे आहे ते विचित्र का आहे?
(मुळात ते तसे आहे का?) आणि त्याचे ऊत्तर काय तर ते तसे नसून मी
ज्यांच्याशी ते पडताळून पाहतोय, त्यांचेच वर्तन ठीक नाहीये! म्हणजे माझे
प्रतिबिंब वाईट नाहीये तर ज्या आरशात मी बघतोय तो आरसाच मुळात भंगलेला
आहे...
पुनश्च आभार!
-नितीन
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 11/05/2007 - 12:16
Permalink
मान्य आहे
नितीन राग मानू नये, छोट्या वृत्तात लिहिणे अवघड असते याची मला पुरेपूर कल्पना आहे. अगोदर प्रतिसाद देताना हे लक्षात आले नाही. त्यामुळेच तुमच्यावर नकळत माझ्याकडून अन्याय झाला. तुम्ही समजून घ्याल ही आशा.
नितीन
शुक्र, 11/05/2007 - 14:23
Permalink
:-)
नाही, मला राग आला नाही... प्रतिसादांमधूनच चुका कळतील...