कसा आज अंधारही सोसवेना


कसा आज अंधारही सोसवेना
मला आज तो चेहराही छळेना
 
कितीदा मनाला दटावून झाले
दिलासा दिला, ते तरीही हसेना
 
नसे खास दुष्यंत हा ओळखीचा
तुझी अंगठी आज मागून घे ना
 
तुझ्या हासण्याने कळाली खुशाली
असे हास्य खोटे मला का जमेना ?
 
कसे पाठवू मी असे शब्द साधे ?
"निरोपा"स का मायना सापडेना ?



गझल: 

प्रतिसाद

मतला छान, चवथा व पाचवा शेर सुरेख
असे हास्य खोटे - सुंदर कल्पना
मायना सापडेना - वा वा, छानच
"हसेना" हा शेर चांगला आहे पण तसा साधा वाटला

कसा आज अंधारही सोसवेना
मला आज तो चेहराही छळेना
- वा...वा...पहिली ओळ सुरेख.
कितीदा मनाला दटावून झाले
दिलासा दिला, ते तरीही हसेना
- सुंदर शेर
 
नसे खास दुष्यंत हा ओळखीचा
तुझी अंगठी आज मागून घे ना
- कल्पना अधिक खुलवता आली असती. गोटीबंदही करता आली असती. चांगला प्रयत्न.
 
तुझ्या हासण्याने कळाली खुशाली
असे हास्य खोटे मला का जमेना ?
- छान.
 
कसे पाठवू मी असे शब्द साधे ?
"निरोपा"स का मायना सापडेना ?
-मस्त. निरोपाला साजेसा शेर !
शुभेच्छा.

एकंदर प्रदीपरावांशी सहमत. 



कितीदा मनाला दटावून झाले
दिलासा दिला, ते तरीही हसेना
वा!

तुझ्या हासण्याने कळाली खुशाली
असे हास्य खोटे मला का जमेना ?
वा..

मला हे शेर विशेष आवडले. अगदी मनापासून आणि सच्चे वाटतात.

कितीदा मनाला दटावून झाले
दिलासा दिला, ते तरीही हसेना
सुंदर !

छान.....
तुझ्या हासण्याने कळाली खुशाली
असे हास्य खोटे मला का जमेना ?

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार

तुझ्या हासण्याने कळाली खुशाली
असे हास्य खोटे मला का जमेना ?    व्वा!
 
कसे पाठवू मी असे शब्द साधे ?
"निरोपा"स का मायना सापडेना ?
कलोअ चूभूद्याघ्या