१२.५५ ए एम - ११.०२.०९ ट्रान्स!

मी नसतो तर कशास येथे पेले असते?
दिवाळखोरी मनावणारे ठेले असते!

मी आहे, जग आहे, हेही भरपुर आहे
दोघे नसतो, काय न जाणे केले असते?

जीवन म्हणजे "सजीवतेचे दाव पुरावे"
जरा चूक झाली असती तर नेले असते

नेम नेमका जिथे नको त्या तिथेच लागे
मला कळावे त्याआधी वळलेले असते

रक्त ओतले, कविता केली, गुन्हाच झाला
यमक जुळविता नशिबी श्रीफल, शेले असते

मी जाताना केले नाही भले कुणाचे
लेकाचे माझ्याआधीही गेले असते










गझल: 

प्रतिसाद

रक्त ओतले, कविता केली, गुन्हाच झाला
यमक जुळविता नशिबी श्रीफल, शेले असते


चांगले  शीर्षक देत  चला  हो  भूषण  साहेब, तो सुद्धा  एक  भाग  असतो  गझलेचा. (शाळेच्या भाषेत- त्याला पण "मार्क" असतात... :)
मतला आणि शेले  हे शेर आवडले.
दुसरा  शेर  असा  केला  तर-
"मी  आहे, अन्  तू  पण  येथे! उदंड झाले !!
एक अभावी  काय  दुज्याने  केले  असते ?"
चूभूद्याघ्या.

रक्त ओतले, कविता केली, गुन्हाच झाला
यमक जुळविता नशिबी श्रीफल, शेले असते
हे पण घ्या.
नाही भरला पूर इथे मीही यमकांचा
काही तरले असते, काही मेले असते
हा ट्रान्स काय प्रकार आहे? शीर्षकाला मी गूण(आता मराठी बोला) नक्की देईन. पण स्थळ कळाले नाही.
कलोअ चूभूद्याघ्या

दुर्दैवाने मला कायमच स्पष्टीकरण द्यावे लागते. हरकत नाही. दखल घेतली जात आहे हे मी समाधानकारक मानतो.

१. ट्रान्स - रात्री एकटाच मी एका गच्चीवर आभाळाकडे पाहत असताना एक स्थिती अशी आली की जिथे मला मनुष्य जन्माचे निरर्थकपण जाणवले. ७०/८० वर्षे जगून निघून जायचे अन त्यात काय काय करायचे! मग हळूहळू माझाच देह मला परका वाटायला लागला. त्या मनस्थितीला मी 'ट्रान्स' हा शब्द वापरला. ( स्थ्ळ - मेहुण्याच्या कोथथरुड मधील घराची प्रशस्त गच्ची - वास्तविक ते सांगणे तसे अनावश्यक आहे, पण विचारले म्हणुन! ) बाय द वे - मला नेहमीच असे होत नाही. तेव्हा झाले यात माझा काही मोठेपणा नाही, सगळ्याच कवींना असे कधी कधी होत असणार!

२. शीर्षक - वास्तविकपणे गझलेला शीर्षकाची आवश्यकता नसतेच. कारण प्रत्येक शेर वेगळा रंग घेऊन येतो. त्यामुळे त्या मनस्थितीचे व स्थळकाळाचे निदर्शक असे शीर्षक दिले.

सर्वांचे मनापासून धन्यवाद!

जीवन म्हणजे "सजीवतेचे दाव पुरावे"
जरा चूक झाली असती तर नेले असते

नेम नेमका जिथे नको त्या तिथेच लागे
मला कळावे त्याआधी वळलेले असते

रक्त ओतले, कविता केली, गुन्हाच झाला
यमक जुळविता नशिबी श्रीफल, शेले असते

जग आणि शेले हे शेर आवडले!

मी आहे, जग आहे, हेही भरपुर आहे
दोघे नसतो, काय न जाणे केले असते?
 
वा ! सुंदर शेर

मी जाताना केले नाही भले कुणाचे
लेकाचे माझ्याआधीही गेले असते

चांगला आहे :)