वराकडील मानपान
निकाल लागला कधीच या जगायचा
उगाच प्रश्न ऐच्छिकातला लिहायचा
पुन्हा नवी पहाट दाखवे नवा जिना
पुन्हा सवाल हाच की कसा चढायचा
न फायदा तरी न मोह सोडला कधी
जसे म्हणायचीस तू तसे करायचा
तुझाच भोंडला तुझाच आव सारखा
खिरापतीस आमच्या न ओळखायचा
वराकडील मानपान मीच पाहतो
असाच भेटलाय तो मला पहायचा
सतर्क जीवनास पाहिजे करायला
नसायचो, उगाच पाळणा हलायचा
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
शनि, 14/02/2009 - 19:53
Permalink
जय हो! जय हो!!
मानपान पाहताय म्हटल्यावर प्रश्नच नाही. पण शेर जरा कठीण जातोय.
जिना, मोह, पाळणा = भन्नाट
भोंडला ही छानच.
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
सोम, 16/02/2009 - 10:57
Permalink
धन्यवाद अजय
अजय,
मनापासून धन्यवाद! संकेतांचा जाणीवपुर्वक वापर करण्याचा हा प्रयत्न होता. आपली दाद मिळाली.
बरे वाटले.
चित्तरंजन भट
सोम, 16/02/2009 - 20:54
Permalink
पुन्हा नवी पहाट दाखवे नवा जिना
पुन्हा नवी पहाट दाखवे नवा जिना
पुन्हा सवाल हाच की कसा चढायचा
वा, छान!
सुनेत्रा सुभाष
मंगळ, 17/02/2009 - 08:49
Permalink
प्रतिसाद
पुन्हा नवी पहाट दाखवे नवा जिना
पुन्हा सवाल हाच की कसा चढायचा
न फायदा तरी न मोह सोडला कधी
जसे म्हणायचीस तू तसे करायचा
तुझाच भोंडला तुझाच आव सारखा
खिरापतीस आमच्या न ओळखायचा
आवडलेले शेर.