गुलाबपाणी
Posted by गौतमी on Wednesday, 11 February 2009
शिंपडायला गुलाबपाणी येउन जा
आज आपल्या जुन्या ठिकाणी येउन जा
काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा
तू न यायचास जाणते, पण म्हणायची
खोड लागली जुनी पुराणी "येउन जा"
एक काळ गीत गायचा 'जायला नको'
आज आळवे करूण गाणी 'येउन जा'
काळजी मला, उगी तुला आठवेन मी
संपवायला जुनी निशाणी येऊन जा
वेड लागले कुणी म्हणे 'गौतमी'स या
बोलते हवेमधे दिवाणी येउन जा
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
बुध, 11/02/2009 - 13:57
Permalink
छान
गौतमी,
अलीकडच्या काळात आपली मला सर्वात जास्त आवडलेली गझल.
भूषण कटककर
गुरु, 12/02/2009 - 23:34
Permalink
व्वा!
वा वा! बोलते हवेमधे दिवाणी! छान!
सोनाली जोशी
शुक्र, 13/02/2009 - 04:22
Permalink
वा!
गौतमी, गझल खूपच छान आहे. आवडली.
सोनाली
ज्ञानेश.
शुक्र, 13/02/2009 - 23:34
Permalink
सुरेख.
गौतमी,
सुरेख गझल . सगळेच शेर आवडले.
तरीही हे दोन जरा जास्तच-
तू न यायचास जाणते, पण म्हणायची
खोड लागली जुनी पुराणी "येउन जा"
एक काळ गीत गायचा 'जायला नको'
आज आळवे करूण गाणी 'येउन जा...
एक शेर त्याच्या बाजूने-
वाट पाहण्यातली जराशी मजा पहा..
एवढे नको म्हणूस राणी - "येउन जा"
चांदणी लाड.
शनि, 14/02/2009 - 11:23
Permalink
मस्त गझल.
गौतमीजी, गझल आवडली,
काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा (क्या बात है.)
खोड लागली जुनी पुराणी , संपवायला जुनी निशाणी , बोलते हवेमधे दिवाणी हे शेर फारच आवडले.
दशरथयादव
शनि, 14/02/2009 - 15:24
Permalink
आवडली
व्वा..छान....
काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा
तू न यायचास जाणते, पण म्हणायची
खोड लागली जुनी पुराणी "येउन जा"
प्रसाद लिमये
रवि, 15/02/2009 - 10:40
Permalink
काळजी मला,
काळजी मला, उगी तुला आठवेन मी
संपवायला जुनी निशाणी येऊन जा
सुंदर
सुनेत्रा सुभाष
मंगळ, 17/02/2009 - 08:57
Permalink
प्रतिसाद
शिंपडायला गुलाबपाणी येउन जा
आज आपल्या जुन्या ठिकाणी येउन जा
काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा
आवडलेले शेर.