मिळते कोठे ?

मिळते कोठे, हवे जे, मिळावया
हुलकावे, ते समोरी, सतावया
निजली स्वप्ने, उशाला, शवापरी
उरले हाती, न काही, गमावया
न उद्याचा, तू करी, घोर रे मना
मिळतो का आज, पाहू, जगावया ?
उरले नाही, बहाणे, जुने नवे
बघ झाला, हा बहाणा, रूसावया
भरल्या पीडा, खचूनी, घरी अशा
करते सुख, आत येण्या, गयावया
पळती वर्षे, सुखाने, पळापरी
युग का लागे, कधी पळ, सरावया
स्मशाना, कुंपणे ही, नको उगा
स्वंये जातो, कुणी का, मरावया

गझल: 

प्रतिसाद

या गझलेचा मक्ता हझलचा शेर आहे. हे स्मशाना, तुला कुंपणे कशाला रे बाबा? कुणी स्वतः थोडीच येणार आहे मरायला? हा हा हा हा !

सरावया, जगावया व गयावया हे उतरत्या क्रमाने उत्तम शेर वाटले.

मात्र 'गमावया' हे गमवावया' असे असते.

वृत्त वेगळेच!

सुख गयावया करते ही मस्त कल्पना वाटली.