सखे

नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता


तुझे चिंब होणे मला आवडे पण
कुणी सावरावा कसा तोल आता


जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता


इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता


असे भावनांनी गडे घे उ़खाणे
सुखाला मनाच्या पुरे सोल आता : बापू दासरी

गझल: 

प्रतिसाद

जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता

इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता
वा...वा... शुभेच्छा.

प्रदीप  कुलकर्णी साहेब  आपला शेरा चेतना देतो :  बापू दासरी

जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता

क्या बात है, बापू! ओलही मस्त. गझल आवडली.

बापू ... गझल आवडली तुझे चिंब होणे मला आवडे पण कुणी सावरावा कसा तोल आता जगाला कळाले किती चांगला मी तुलाही कळूदे ख्ररे मोल आता इथे वेदनांचे उमाळे उसासे कुठे डोळियांना खरी ओल आता

बापू ... गझल आवडली तुझे चिंब होणे मला आवडे पण कुणी सावरावा कसा तोल आता जगाला कळाले किती चांगला मी तुलाही कळूदे ख्ररे मोल आता इथे वेदनांचे उमाळे उसासे कुठे डोळियांना खरी ओल आता

बापू.
गझल आवडली

तुझे चिंब होणे मला आवडे पण
कुणी सावरावा कसा तोल आता



जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता



इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता

जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता