घे हमी तू.......

मिळेल त्याच्यामधेच राहू खुशाल मी तू
नको नको ते नको विचारूस गौतमी तू


इलाज नाही इथे ऋतू, माणसांस काही
कळी सुगंधास वा दिखाव्यास मौसमी तू


तुझ्यात माता तुझ्यात पत्नी तुझ्यात दासी
तुझ्यात वारांगना जगाची, तुझी कमी तू


कधी कधी सासरास होते तुझीच होळी 
दिलास हुंडा? करून घे रंगपंचमी तू  


कधी कुणाचा न दोष वाटेल हुंगणार्‍या
तुझीच शंका, जगामते गैरलाजमी तू


पती कुठे शेण खायचा तो हिशोब नाही
सती तुला लावतील जाण्यास घे हमी तू


~~~ही स्त्रीवरील प्रातिनिधिक गझल आहे~~~


गौतमी -


 



 


 


 

गझल: 

प्रतिसाद

गौतमी...
गझल आवडली.....

कधी कुणाचा न दोष वाटेल हुंगणार्‍या
तुझीच शंका, जगामते गैरलाजमी तू



पती कुठे शेण खायचा तो हिशोब नाही
सती तुला लावतील जाण्यास घे हमी तू

प्रातिनिधिक गझल म्हणजे काय? आपले मुद्दे सामाजिक आहेत. मांडणी, शब्दांची निवड आवडली.
पण यात व्यक्तिगतपणाचा अभाव जाणवला.
माफ करा! हल्ली माझी मते जरा अप्रिय होऊ लागली आहेत.
आधी फक्त गझलाच अप्रिय असायच्या... हा हा हा !

आशय सामाजिकच आहे. रंगपंचमी, सती द्विपदी विशेष आवडल्या.
प्रातिनिधिक काव्य = मान्य.
गझल = शंका वाटते.
कलोअ चूभूद्याघ्या

खूप म्हणजे खूपच छान.
स्त्रीवरिल प्रतिनिधिक असल्यामुळे छानच.
व्यक्तिगतपणा किंवा शंका वगैरे लक्ष देऊ नकोस. लिहित जा. मला वाचायला मजा येते. टीका करण्यापेक्षा गौतमीला काय म्हणायचे आहे ते पहा म्हणजे झाले.