भणंग ४

लाकडे पोचली काल, तोही चळे
वासना पाहुनी काळ मागे वळे

लाथ मी मारतो तेथ पाणी निघे
पापणीला कधी लागली ना कळे

वागणे बोलणे दोष सारे तिचे
पण सुके बाजुला आणि ओले जळे

पेरले बी जगाने नको ते तरी
झाड देऊ करी जी हवी ती फळे

देव जे पाहिजे तेच लंपासतो
जिंदगी आपली आंधळ्याने दळे

 

 



 

गझल: 

प्रतिसाद

हे छान.
कलोअ चूभूद्याघ्या

या 'गझलेतील' (?) वृत्त व आपले नांव कळेल काय?
 

लाथ मी मारतो तेथ पाणी निघे
पापणीला कधी लागली ना कळे

छान आहे