काय सांगू

काय  सांगू  कसे  मी  कुणाला?
भ्यायले  चांदणे  गारठ्याला


रक्त  माझे  असे  का  पेटले?
झेलता  मी  जरासे  उन्हाला


गंध  दाटून  येता  स्मृतींचा
फूल  यते  कसेरे  फळाला?


आसवांचा  सदा  घोळ  आहे
ऐनवेळी  कोंडती  घशाला


भ्रमर  येथे  कशाला  फिरे  तो?
बाग  रागावली रे  फुलाला


तृप्त  झाले  अशी  मी  लिहोनी
आज  घेते  गझल  ही  उशाला

गझल: 

प्रतिसाद

ऊन चांगलअ आहे.

यावेळी काही विशेष जमलेसे वाटत नाही.
कल्पना सर्वच चांगल्या आहेत.
कलोअ चूभूद्याघ्या

सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
घशाला कोंडती हा शेर अतिशय छान आहे. कल्पना सुंदर आहे.
तसेच मक्त्यातली कल्पना पण छान आहे. अभिनंदन!
कृपया गैर मानू नका, पण आपण आपल्या रचनांमधून निसर्गाचे उल्लेख काही काळ गाळून पहा.
जसे: चांदणे, गारठा, उन, फूल, फळ, भ्रमर वगैरे! त्यामुळे आपल्यावर फक्त रोजच्या वापरातील शब्द योजण्याची मर्यादा येईल अन त्यामुळे आपोआपच रचना वाचकाला आपलीशी वाटायला लागेल.
धन्यवाद!
 
 

मा. अजय,
मला जमले नाही की तुम्हाला समजले नाही हे जरा तपासून पहा.
मा.भूषण,
आभार.
आणि एक सांगणे. फक्त रोजच्या वापरातील शब्दच जर तुम्हाला आपलेसे वाटत असतील तर याहून मोठी खेदजनक गोष्ट नाही. रोजच्या वापरातील शब्दच वापरण्याची मर्यादा मी स्वत:वर घालू इच्छित नाही. त्यापेक्षा तुम्हीच निसर्गात रमलात तर ही रचना तुम्हाला ही आपलीशीच वाटेल.
आपली नम्र,
सुनेत्रा सुभाष

सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
माफ करा! आपल्याला जर माझ्या प्रतिसादामुळे कुठल्याही प्रकारचा मनस्ताप झाला असेल तर!
खात्री बाळगा की यापुढे मी आपल्याला एकही प्रतिसाद देणार नाही, जोपर्यंत आपण स्वतः तसे म्हणत नाही तोपर्यंत!
पुन्हा एकदा दिलगिरी!
 

आपल्या  प्रतिसादांचा  मनस्ताप  मला  झाला  असे  आपणास  कसे  काय  वाटले?
मी  तर  फक्त  नम्र  सूचना  केली.आपण  असेच  प्रतिसाद  देत  चला.आणि  मीही  काही  सूचना  केल्यातर  एवढे  मनाला  लावून  घेऊ  नका.

या  गझलेतील  दुस-या  शेरातील  पहिली  ओळ  अशी  वाचावी,
पेटले  रक्त  माझे  असे का?
कारण  या  गझलेचे  वृत्त 
गा ल गा गा   ल गा गा   लगा गा   असे  आहे.
त्याचप्रमाणे  चवथ्या  शेरात    कोंडती  या  ऐवजी  दुसरा  शब्द  हवा  होता.

उशाला गझल आयडिया मस्त आहे.

चांदणे भ्यायले हे छान वाटले.