चांदणे प्रेमातले....

चांदणे प्रेमातले....

हे भासही प्रेमातले, हे वागणे प्रेमातले
जे प्रेम ह्रदयी दाटले, ते मागणे प्रेमातले..

तुझी लाज ही डोळ्यातली अन् हासणे गालातले
स्वप्नामधे तूज पाहणे, अन् जागणे प्रेमातले..

हा चांदवा चेहरा तूझा अन् रात्र तव केसांपरी
बेधुंद तुजवरी मी सखे, अन् चांदणे प्रेमातले..

ही सोबतीला साथ तुझी अन् चालणे प्रेमातले
त्या चंद्रमेच्या साक्षीने ते थांबणे प्रेमातले..

माझे तुझे नाते असे जणू चंद्रमेचे चांदणे
मम प्रेम ह्रदयी तूझेच गं, हे सांगणे प्रेमातले...

हे भासही प्रेमातले, हे वागणे प्रेमातले
जे प्रेम ह्रदयी दाटले, ते मागणे प्रेमातले..

-ग. वि. मिटके

[गझल फक्त टीजरमध्ये टाकू नका. दिसणार नाही. टीजर टेक्स्टएरियाच्या खालच्या टेक्स्टएरियातही मजकूर असला तरच तो मजकूर दिसेल.]

गझल: 

प्रतिसाद

[पूर्वीचा चुकून दिलेला प्रतिसाद मीच संपादित केला आहे]
तुझी लाज ही डोळ्यातली - कल्पना आवडली.
बाकी वृत्त वगैरे तपासणे बघावे. शुभेच्छा!
कलोअ चूभूद्याघ्या

माफ करा! पण या रचनेत तांत्रिक बाबतीत अनेक चुका दिसत आहेत.
काही शेरांमधील आशय आवडला.
धन्यवाद!

मा.भूषण,
आता गझल दिसते आहे.
कलोअ चूभूद्याघ्या

'गझल' या शब्दावर क्लीक करा अन खाली खाली जात रहा. मग दिसते.
मला वाटले आपण गझल पाहून तो प्रतिसाद दिलात .. हा हा हा!

तंत्र जमणे अवघड नाही.
तिलकधारीच्या शुभेच्छा!

मला तरी फार आवडली. किती छान कल्पना अन शब्द आहेत. अजय जोशी गंमतीजमती करतात.