फालतूपणा

जुना किल्ला मनाचा, बुरुजही उध्वस्त झालेले
शिपाई सर्व आशेचे पुरे सन्यस्त झालेले


बरे ज्याचे करावे तो म्हणे माझे खरे आहे
फुका जाणार ते लावण्यही मदमस्त झालेले


निघाली योजना 'एकावरी घ्या एक' देवाची
लुटा जन्माबरोबर मरण आता  स्वस्त झालेले


नशा मी भूतलाची एवढी उपभोगली की बस
पुन्हा चक्रात आले मोक्षवासी त्रस्त झालेले


पुढे जो काळ आहे यायचा तो अधिक आहे की
न जाणे दीर्घ ते आयुष्य जे की फस्त झालेले


 



 


 


 


 






 

गझल: 

प्रतिसाद

पुढे जो काळ आहे यायचा तो अधिक आहे की
न जाणे दीर्घ ते आयुष्य जे की फस्त झालेले

समीरशी सहमत.
कलोअ चूभूद्याघ्या