तू कशी जाशील...?
................................
तू कशी जाशील... ?
.................................
तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?
मी तुरुंगातील कैदी आठवांच्या...
मी कधी सुटणार अटकेतून माझ्या ?
फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या !
नीट घे निरखून, न्याहाळून आता...
तूच आढळशील प्रतिमेतून माझ्या !
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!
त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या !
भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या !
चंद्र मज दिसला़; तरी दिसलाच नाही...!
भाकरी तू शोध उपमेतून माझ्या !
प्रेरणा होऊन ये माझ्या मनाची...
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या !
- प्रदीप कुलकर्णी
गझल:
प्रतिसाद
प्रसाद लिमये
गुरु, 15/01/2009 - 18:18
Permalink
तू जरी
तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?
मी तुरुंगातील कैदी आठवांच्या...
मी कधी सुटणार अटकेतून माझ्या ?
फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या !
नीट घे निरखून, न्याहाळून आता...
तूच आढळशील प्रतिमेतून माझ्या !
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!
त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या !
अ फा ट
प्रसाद लिमये
गुरु, 15/01/2009 - 18:22
Permalink
शेवटचे दोन
शेवटचे दोन शेर ही सुरेख आहेत. पण त्या आधीचे सगळे अफाट आहेत
सोनाली जोशी
गुरु, 15/01/2009 - 19:30
Permalink
वा
प्रदीप,
भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या !
चंद्र मज दिसला़; तरी दिसलाच नाही...!
भाकरी तू शोध उपमेतून माझ्या !
प्रेरणा होऊन ये माझ्या मनाची...
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या !
- हे तीन प्रामुख्याने भावले.
सोनाली
सुनेत्रा सुभाष
शुक्र, 16/01/2009 - 10:14
Permalink
डोळेझाक
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!
शेर आवडला.
अच्युत
शुक्र, 16/01/2009 - 16:25
Permalink
तू जरी
तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ?
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!
वा वा, डोळेझाक ची कल्पना सुरेख
ज्ञानेश.
शुक्र, 16/01/2009 - 23:36
Permalink
जबरदस्त.
हे शेर फार फार आवडले-
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!
त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या !
आणि हा शेर-
भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या... !
हेवा वाटावा अशी पकड आहे तुमची गझलेवर.
dhanyavaad!
तिलकधारी
शनि, 17/01/2009 - 10:32
Permalink
कविता
ही रचना कविता जास्त वाटत आहे, गझल कमी.
सामान्य रचना!
भूषण कटककर
शनि, 17/01/2009 - 11:24
Permalink
सुंदर गझल
खूपच सुंदर गझल आहे. आवडली. मोहक गझल!
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या...व्वा!
प्रदीप कुलकर्णी
शनि, 17/01/2009 - 13:52
Permalink
सगळ्यांचे मनापासून आभार...
प्रतिसाद देणाऱया सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.
योगेश वैद्य
शनि, 17/01/2009 - 14:53
Permalink
मतला
अजरामर आहे प्रदीप.
डोळेझाक लई झ्याक!
अजय अनंत जोशी
शनि, 17/01/2009 - 21:10
Permalink
तू न उतरावेस नजरेतून माझ्या
तू जरी गेलीस दुनियेतून माझ्या !
तू कशी जाशील कवितेतून माझ्या ? मस्त विचार.
दुस-या ओळीत :: पण कशी जाशील कवितेतून माझ्या ! किंवा ? -- हे कसे वाटते? त्यामुळे 'तू' ची पुनरावृत्ती टळते असे मला वाटते.
मी तुरुंगातील कैदी आठवांच्या...
मी कधी सुटणार अटकेतून माझ्या ? हा ही मस्त विचार.
इथे 'मी' ची पुनरावृती आहे. पण ती टाळावी की नाही हे समजत नाहीये.
फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या ! चांगला विचार.
नीट घे निरखून, न्याहाळून आता...
तूच आढळशील प्रतिमेतून माझ्या ! उत्तमच.
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !! अफलातून.. ग्रेट.
त्वेष लाखो माणसांना देत गेले...
सांडले जे रक्त जखमेतून माझ्या ! चांगला विचार.
भेटले हेतूविना कोणीच नाही...
यायचे ध्यानात पण हेतू न माझ्या ! चांगला विचार.
या ठिकाणी दुसरी ओळ वाचल्यानंतर जशी लक्षात येते तशी म्हणताना येईल कि नाही असे वाटते. कारण, सुटा असलेला 'न' बोलताना फारच वेगळा दाखवावा लागतोय.
चंद्र मज दिसला़; तरी दिसलाच नाही...!
भाकरी तू शोध उपमेतून माझ्या ! चांगला विचार.
प्रेरणा होऊन ये माझ्या मनाची...
रोज ये उमलून प्रतिभेतून माझ्या ! मस्तच.
कलोअ चूभूद्याघ्या
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 23/01/2009 - 20:28
Permalink
व्वा
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !!
जयन्ता५२
शुक्र, 23/01/2009 - 21:22
Permalink
दर्जेदार!
नेहमीप्रमाणे दर्जेदार गझल!
जयन्ता५२
बोलू का
शनि, 24/01/2009 - 13:27
Permalink
चांगले लिहिलेत
आपण लिहिता चांगले. पण, पुन्हा तेच ते वाचल्यासारखे वाटते.
चांगली -
(तसा मी फारसा बोलत नाही.)
प्रदीप कुलकर्णी
शनि, 24/01/2009 - 15:03
Permalink
पुन्हा एकदा आभार...
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.
प्रदीप गांधलीकर
शनि, 24/01/2009 - 17:50
Permalink
सुंदर गझल
गझल आवडली.
मानस६
शनि, 24/01/2009 - 22:54
Permalink
डोळेझाक केली...
मी अशासाठीच डोळेझाक केली...
तू न उतरावेस नजरेतून माझ्या !! बहोत बढिया
फार उशिरा समजले की, पत्थराला -
- वाहिले मी हृदय शपथेतून माझ्या ! ..वा
-मानस६