अंतरे राखूनही ...
अंतरे राखूनही तू आज माझ्या काळजाला छेडले
मोकळी असले तरी बेताल तुझिया आठवांनी घेरले
माहिती होते मला उत्सूक नाही तू जराही भेटण्या...
वास्तवाचे भान असुनीही तुला स्वप्नी जरा मी भेटले
चांदणे आकाश भरुनी वाहते आहे, जशी गंगा इथे -
मुक्त करते पापियांना तेज तैसे वाढते चंद्रातले
सांजवेळी सूर्य कलता जीवनाचे भाष्यही समजून घे
दाखवे ती सावली की प्रेम वाढावे तुझ्या-माझ्यातले
अंत नाही प्रीतिला माझ्या-तुझ्या, स्वर्गी जरी आहेस तू...
भेटण्याला जीव आहे सोडला, नाही तुला मी सोडले
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
रवि, 18/01/2009 - 23:02
Permalink
सुंदर
अंतरे राखूनही तू आज माझ्या काळजाला छेडले
मोकळी असले तरी बेताल तुझिया आठवांनी घेरले
मतला अतिशय छान अजय!
भेटण्याला जीव आहे सोडला, नाही तुला मी सोडले
सुंदर ओळ.
भूषण कटककर
रवि, 18/01/2009 - 23:03
Permalink
स्स्स्स्स...
माहिती होते मला उत्सूक नाही (स)तू जराही भेटण्या...
हा 'स' घेता यावा म्हणुन असे केले तर चालेल का?
माहिती होते मला उत्सूक तू नाहीस भेटायास पण
अजय अनंत जोशी
रवि, 18/01/2009 - 23:17
Permalink
कळते आहे... पण..
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळते आहे. पण 'जराही' या शब्दातून जे व्यक्त होत आहे तसे तुम्ही सुचविलेल्या ओळीतून होत नाही. तरी असे करता येईल.
माहिती होते मला उत्सूक नाहिस तू जराही भेटण्या
धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या
सुनेत्रा सुभाष
सोम, 19/01/2009 - 10:11
Permalink
प्रतिसाद
अंत नाही प्रीतिला माझ्या-तुझ्या, स्वर्गी जरी आहेस तू...
भेटण्याला जीव आहे सोडला, नाही तुला मी सोडले
आवडला शेर
तिलकधारी
सोम, 19/01/2009 - 13:54
Permalink
सुधारणा
सुधारणा दिसत आहे.
अजय अनंत जोशी
शुक्र, 23/01/2009 - 19:11
Permalink
धन्यवाद.
धन्यवाद सुनेत्रा, तिलकधारी(काका)
थोडे मोठे वृत्त आहे. पण हे मुद्दाम घेतले नाही. जसे सुचले तसेच पुढे घेतले.
कलोअ चूभूद्याघ्या
बोलू का
शनि, 24/01/2009 - 13:19
Permalink
अजून काम करायला हवे
थोडे अजूम काम केले असतेत तर..?
बरी+
(तसा मी फारसा बोलत नाही.)
चांदणी लाड.
रवि, 01/02/2009 - 12:02
Permalink
छान!! मतला
छान!! मतला आवडला..
अंत नाही प्रीतिला माझ्या-तुझ्या, स्वर्गी जरी आहेस तू...
भेटण्याला जीव आहे सोडला, नाही तुला मी सोडले
हा शेर आवडला....