आणखी एक सपाट गझल

इये उल्हासनगरी होइ काफिर पीर एखादा
इथे वर्षात केवळ पाच होतो 'मीर' एखादा


सहा महिन्यात अडचण एक, पण ती वर्षभर चाले
रसिक हातात बारामास धरतो धीर एखादा


लवंगी माळ उडल्यावर फुसुक्कन वाजते काही
लढाई संपल्यावर येत राही तीर एखादा


हजारो वर्ष गेल्यावर सपाटीचा गिरी होतो
परंतू येथला नसणार तेथे वीर एखादा


सफाई यायला तय्यार नाही या गझलमध्ये
किती सांभाळले, निघतो तरी खंजीर एखादा


इथे धुमकेतुचे प्रतिसाद अन धुमकेतुच्या चर्चा
इथे झाकोळला जाईल कारागीर एखादा


जिथे होणार नाही एकही भूकंप साधासा
तिथे चालायला रस्ता स्वतः तू चीर एखादा ( अजय जोशी यांचा शेर )


"गझल ही आरसा आहे तुझ्या अस्वस्थ ह्रदयाचा..
कधी झाला असावा घाव ही गंभीर एखादा !" ( ज्ञानेश यांचा शेर )


श्री अजय जोशी व श्री ज्ञानेश यांनी सुचवलेले शेर आवडल्यामुळे मी ते गझलेत ऍड केले आहेत. अर्थातच हे फक्त या साईटपुरते आहे. इतरत्र मी ते शेर कधीच सादर करणार नाही.


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

रचनेच्या शीर्षकामधील आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे.

इये उल्हासनगरी होइ काफिर पीर एखादा
इथे वर्षात केवळ पाच होतो 'मीर' एखादा
अलामत सोड चिंता तू, ळ ची जुळवाजुळव नंतर आणखीन एक विचित्र शीर्षकाची ( आणखी एक सपाट गझल ) गझल सादर करून कवी भूषणने जो अलौकीक प्रतिभेचा आविष्कार सादर केला आहे त्यासाठी त्याचे अभिनंदन! उल्हासनगरमधे डुप्लीकेट गोष्टी मिळतात हे माहीत होते. पण एखाद्या पीराचा काफिर किंवा काफिराचा पीर होतो हे माहीत नव्हते. तसेच पाच वर्षात मीर होण्यासाठी उल्हासनगरच असले पाहिजे अशी काही अट असते याचे आम्हाला ज्ञान नव्हते. मुळात मतला गझलेचा शेरच नाही. ती एक टीका आहे, बहुतेक गझल या क्षेत्रात आलेल्या अपयशामुळे निर्माण झालेली.


सहा महिन्यात अडचण एक, पण ती वर्षभर चाले
रसिक हातात बारामास धरतो धीर एखादा
दादा कोंडकेंनंतर असे संवाद ऐकायला मिळालेच नव्हते. ती एक त्रुटी भरुन काढणारा असा हा शेर आहे.


लवंगी माळ उडल्यावर फुसुक्कन वाजते काही
लढाई संपल्यावर येत राही तीर एखादा
अप्रतिम! खरोखरच लवंगी माळ उडल्यावर निदान एक तरी फटाका असा असतोच जो सगळे संपल्यावर अचानक फुस्स आवाज करून वाजतो. त्याची उपमा लढाई संपल्यावर येत राहणार्‍या बाणाला दिली आहे. पण या सगळ्याचा कशाशी संबंध आहे ते स्पष्ट होत नाही.


हजारो वर्ष गेल्यावर सपाटीचा गिरी होतो
परंतू येथला नसणार तेथे वीर एखादा
बहुतेक 'गाळलेल्या जागा भरा' असा शालेय परीक्षेचा पेपर रचलाय.


सफाई यायला तय्यार नाही या गझलमध्ये
किती सांभाळले, निघतो तरी खंजीर एखादा
या प्रांजळपणाबद्दल मात्र स्तुती केलीच पाहिजे.


इथे धुमकेतुचे प्रतिसाद अन धुमकेतुच्या चर्चा
इथे झाकोळला जाईल कारागीर एखादा
काय भविष्यवाणी आहे! व्वा! एखादा कारागीर झाकोळला जाईल. सुंदर! चर्चा,  प्रतिसाद देणारे धुमकेतू आहेत याच्याशी झाकोळले जाण्याचा काय संबंध आहे हे विचारणे कवी तिलकधारीकाका यांचे काम आहे.
आमच्यामते एक अत्यंत अप्रतिम गझल करून या कवीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. 

जिथे होणार नाही एकही भूकंप साधासा...
समांतर चालण्याला तूच रस्ता चीर एखादा
कलोअ चूभूद्याघ्या

सलग म्हणायला अवघड जाते आहे.
लढाई संपल्यावर येत राही तीर एखादा          वा! व्वा!
गम्मत : सपाटीबद्दल समजू शकतो. पण ही गझल आहे का?
कलोअ चूभूद्याघ्या

गझल बाजारबुणग्याची कळस गाठून झळके अन
दया येऊन तेथेही करे खातीर एखादा
 

अजय,
ही गझल नाही.

गझल सपाट असते म्हणजे काय, हे मला तरी अद्याप कळलेले नाही. पण या सपाटीकरणामुळे सदर गझलेचा वेग सुसाट वाढलाय, हे निश्च्चित.
भूषणजी, हा शेर खास तुमच्यासाठी-
"गझल ही आरसा आहे तुझ्या अस्वस्थ ह्रदयाचा..
कधी झाला असावा घाव ही गंभीर एखादा !"

चूभूद्याघ्या.

मा.भूषण
आपण बरेच मोठे अहात माझ्यापेक्षा. पण असे काय लिहिता? आपल्यापेक्षा बाकीच्यनी सुचवलेल्या ओळीच चंगल्या वाटतात.
गझल सपाट असते म्हणजे काय? मलातर सगळेच चांगले वाटते. असे नव देण्याचे कारण काय? काहितरीच. आपणच ही गझल नाही हे म्हणता. मग दिली कशाला?