मला बोलायचे असते
तुला भावेल ते सारे मला बोलायचे असते
असे मी बोलते त्यातून तू समजायचे असते
पुरे आता पुरे आता म्हणे याच्याचसाठी मी
तुझे माझे सुखाचे शिखर अजुनी यायचे असते
तुझ्यामाझ्यात राती वाद होतो एवढ्यासाठी
मला झोपायचे नसते तुला जागायचे असते
तुला मी वाढते जेवायला घाईत थोडेसे
तुलाही नेमके जेवण कसे उरकायचे असते?
जिथे काही कमी नाही अशा दुनियेत तू अन मी
मला जे घ्यायचे असते तुला ते द्यायचे असते
'मिटावे ओठ मी' संदेश हादेखील आहे रे
तुला सांगायचे असते, कसे वागायचे असते
तुझा विश्वास असल्यानेच देते साथ मी तुजला
जिथे मज जायचे असते तुलाही न्यायचे असते
उगाचच केस बांधावे उगाचच केस सोडावे
तसे काहीच नाही बस तुला जळवायचे असते
तुझ्या साथीत हे आयुष्य म्हणजे काय ते कळले
कधी जिंकायचे असते कधी हारायचे असते
गझल:
प्रतिसाद
तिलकधारी
शनि, 17/01/2009 - 11:06
Permalink
वृद्धाश्रम!
फक्त मतला अन जळवायचे असते हे दोनच शेर ठीक. बाकी कविता आहे. ज्येष्ठ नागरिक संघात किंवा वृद्धाश्रमात सादर करण्यासारखी. किंवा हल्ली हास्यक्लब निघालेत तिथे म्हणुन पहावी.
भूषण कटककर
शनि, 17/01/2009 - 11:38
Permalink
एकाला झोपायचे नाही अन दुसर्याला जागायचे आहे, हा हा हा...
हा हा हा हा...
मला झोपायचे नसते तुला जागायचे असते.
मस्त! चांगली गझल आहे.
प्रसाद लिमये
शनि, 17/01/2009 - 12:03
Permalink
एकदम
एकदम फडाड
उगाचच केस बांधावे उगाचच केस सोडावे
तसे काहीच नाही बस तुला जळवायचे असते
दशरथयादव
शनि, 17/01/2009 - 13:31
Permalink
सुरेख.....दोन
सुरेख.....
दोन्ही शेर भावले...
देते साथ मी तुजला
तुझा विश्वास असल्यानेच देते साथ मी तुजला
जिथे मज जायचे असते तुलाही न्यायचे असते
उगाचच केस बांधावे उगाचच केस सोडावे
तसे काहीच नाही बस तुला जळवायचे असते