दीनांच्या चाकरीसाठी : लोकशाहीर वामनदादा कर्डक
भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.
उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.
निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.
भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.
तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे.
लोकशाहीर वामनदादा कर्डक
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
अनंत ढवळे
रवि, 02/12/2007 - 09:54
Permalink
प्रतिभावंतांची घोर उपेक्षा --भारतीय समाजाचे अधःपतन...
व्वाह व्वा!!
वामन कर्डकांची गझल पाहून आनंद झाला...वामन दादांच्या नावावर सध्या अनेकांचे खिसे भरताहेत...या महान कलावंताची झालेली भयंकर उपेक्षा भारतीय समाजाच्या अधःपतनाचे द्योतक आहे...मीर चा शेर आठवला..
था वो तो रश्के हूर बहिश्ती हमीं में "मीर"
समझे ना हम तो फहम का अपनी कूसूर था...
तो स्वर्गातल्या सौन्दर्यालाही लाजविणारा ( प्रकाश ) आमच्यातच उपस्थित होता..जर आम्ही त्याल ओळ्खू शकलो नाहीत , तर हा आमच्या आकलनक्षमतेचा दोष होता..
चुकीच्या गोष्टीच्या उदात्तिकरणात रमलेल्या भारतीय समाजाकडून फार अपेक्षा करणे चुकीचे आहे , आणि ही जाणीव संतापदायक आहे..
चित्तरंजन भट
सोम, 03/12/2007 - 11:02
Permalink
सहमत
[quote=अनंत ढवळे]व्वाह व्वा!!
वामन कर्डकांची गझल पाहून आनंद झाला...वामन दादांच्या नावावर सध्या अनेकांचे खिसे भरताहेत...या महान कलावंताची झालेली भयंकर उपेक्षा भारतीय समाजाच्या अधःपतनाचे द्योतक आहे...मीर चा शेर आठवला..
था वो तो रश्के हूर बहिश्ती हमीं में "मीर"
समझे ना हम तो फहम का अपनी कूसूर था...
तो स्वर्गातल्या सौन्दर्यालाही लाजविणारा ( प्रकाश ) आमच्यातच उपस्थित होता..जर आम्ही त्याल ओळ्खू शकलो नाहीत , तर हा आमच्या आकलनक्षमतेचा दोष होता..
चुकीच्या गोष्टीच्या उदात्तिकरणात रमलेल्या भारतीय समाजाकडून फार अपेक्षा करणे चुकीचे आहे , आणि ही जाणीव संतापदायक आहे..
[/quote]अनंतरावांशी सहमत आहे.
गंभीर समीक्षक
सोम, 22/12/2008 - 23:48
Permalink
हे काय चाललंय काय?
भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.
हास्यास्पद! कवी अनंतसारख्या गाजलेल्या गझलकाराने मीरच्या त्या शेराचा असा संदर्भ लावावा ही गोष्ट आमच्या दृष्टीने हास्यास्पद आहे. मीरने तो शेर कुठल्या संदर्भात रचला होता अन इथे तो कुठल्या संदर्भात वापरला गेला आहे! पालकदत्त नावाने वावरून काही विशेष योगदान केले जात नाही हेच खरे! मीरचा तो शेर स्वतःला मिळालेल्या उपेक्षेला अनुसरून आहे. इथे तो भलत्याच अर्थाने वापरला गेला आहे. मुळात या रचनेत ( या रचनेला आम्ही तरी गझल म्हणु शकत नाही ) दुसर्या ओळीत वृत्तच चुकले आहे. ही रचना मान्यवरांच्या गझलेत येणे हे या साईटसाठीच योग्य नाही. दी चे दि व्हायला पाहिजे अन इ चे ई व्हायला पाहिजे. आता ते तसे लिहिले नाही तरीही ते तसेच आहे असे समजावे असे म्हणायचे असेल तर वरचे 'बाराखडी' हे सदर काढून टाकले तर बरे होईल. आम्ही मुद्दाम आक्रमक पवित्रा घेत आहोत कारण या अशा गोष्टींना काही अर्थच नाही.
उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.
भी चे भि व्हायलाच पाहिजे. अन्यथा ही गझल विचाराधीन विभागात नेली जावी. या शेराचा अन 'गझल' या काव्यप्रकाराचा संबंध काय हे आम्हाला कुणी सांगेल काय? या साईटवर वृत्तातल्या चुका असलेल्या गझला 'मान्यवरांच्या गझला' या सदरात कशा काय मोडू शकतात?
निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.
हे स्थान कुणी मागावे? ज्यांना निवारा नाही त्यांच्यासाठी मनाच्या मंदीरामध्ये 'स्थान' कुणी मागावे? हा विचार आहे की इच्छा आहे की सूचना आहे की विनंती आहे की प्रार्थना आहे? याच्यात पद्य काय? ज्यांना निवारा नाही त्यांच्यासाठी मनात स्थान ठेवावे असे हे एक साधे विधान आहे. हे कुणाचे विधान आहे?
भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.
भू.....भू कसा काय चालू शकेल? भु पाहिजे.
तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे
भीमावरची मधला भी दीर्घ कसा?
ही एक संपूर्णपणे एका विशिष्ट व्यक्तिमत्वाला वाहिलेली रचना असून ही गझल नाही.
माफ करा. आम्हाला त्या व्यक्तीबद्दल अर्थातच प्रचंड आदर आहे तसेच या कवीबद्दल व्यक्तीगतरित्या आदरच आहे पण ही रचना म्हणजे गझल नाही.
ही रचना 'मान्यवरांच्या गझला' या सदरात असूच शकत नाही असे आमचे म्हणणे आहे.
दशरथयादव
रवि, 11/01/2009 - 22:03
Permalink
प्रति,
प्रति, गम्भीर समीक्शक
गझलेच्या त्न्त्राचे ठीक...
वामनदादा कर्डकान्चा असा अनादर
बरा वाटला नाही.
गझल टाइप करताना मागे पुढे ठीक....
अर्थाला मह्त्व द्या...काना मात्रा थीक.....
दशरथयादव
रवि, 11/01/2009 - 22:03
Permalink
प्रति,
प्रति, गम्भीर समीक्शक
गझलेच्या त्न्त्राचे ठीक...
वामनदादा कर्डकान्चा असा अनादर
बरा वाटला नाही.
गझल टाइप करताना मागे पुढे ठीक....
अर्थाला मह्त्व द्या...काना मात्रा थीक.....
गंभीर समीक्षक
सोम, 12/01/2009 - 23:05
Permalink
तीन गोष्टी
बाळ कवी दशरथ,
तुला तीन गोष्टी सांगाव्याश्या वाटतात.
१. शुद्धलेखन महत्वाचे आहे व वृत्तही महत्वाचे आहे.
२. ही साईट फक्त 'मराठी गझल' या विषयावरची आहे. सदर रचना ही कितीही चांगली असली तरी ती आमच्यामते गझल नाही. ( आशयाच्या दृष्टीने )
३. वामनदादा कर्डकांबद्दल वा त्यांच्या रचनेतील ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अनादर बाळगण्याची मुळात आमची पात्रताच नाही. त्यामुळे तसे आमच्याहातून होण्याची शक्यता पूर्णपणे मावळत आहे. ही साईट फक्त गझलसाठी असताना या रचनेचा समावेश साईटवरील सर्वोत्कृष्ट गझलांमधे होतो याची खंत वाटली म्हणुन आम्ही हे सगळे लिहिले.
४. एकच मुद्दा मांडायचा असेल तर एकच प्रतिसाद दिल्यास बरे होईल. उगाच दोन दोन तीन तीन प्रतिसाद देण्यात काहीही अर्थ नाही.
दशरथयादव
गुरु, 15/01/2009 - 16:32
Permalink
प्रति,
प्रति, गंभीर समीक्षक
शुद्धलेखन महत्वाचे आहे व वृत्तही महत्वाचे हे आपले म्हणने ठीक...
आपला गझलेबद्द्ल अभ्यास असेलही...पण आपल्या प्रतिक्रियेवरून तुम्हाला राग आला असे दिसते...याचा अर्थ मत माण्डायचे नाही असा नाही...
आपल्या सूचना ठीक...
शुद्धलेखनाबाबत...
ही किबोर्ड समस्या आहे...
समस्या सोडून ईलाज नको आहे.. अन हो .... आपले खरे नाव लिहा..
पारद्र्शकता असावी..
थोडे स्पस्ट्...राग नसावा...