मलई : प्रदीप निफाडकर
अंथरतो मी जेव्हा चटई
डोळे मिटती वासे तुळई
मुले टिव्हीच्या समोर बसली
शुभंकरोती गाते समई
गरिबी अपुली अशीच राहो
आपण दोघे एकच दुलई
हळद उतरली पोर जळाली
कोपऱ्यात ही रडते सनई
कसेबसे जगतात कवी हे
कुबेर झाले सारे गवई
कविता माझी दुधाप्रमाणे
गझला म्हणजे नुसती मलई
-- प्रदीप निफाडकर
२९, रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट्स, आनंदनगर,सिंहगड रस्ता, पुणे-४११ ०५१.भ्रमणध्वनी ९८५०३८४२३२. ईमेल : gazalniphadkar@com
डोळे मिटती वासे तुळई
मुले टिव्हीच्या समोर बसली
शुभंकरोती गाते समई
गरिबी अपुली अशीच राहो
आपण दोघे एकच दुलई
हळद उतरली पोर जळाली
कोपऱ्यात ही रडते सनई
कसेबसे जगतात कवी हे
कुबेर झाले सारे गवई
कविता माझी दुधाप्रमाणे
गझला म्हणजे नुसती मलई
-- प्रदीप निफाडकर
२९, रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट्स, आनंदनगर,सिंहगड रस्ता, पुणे-४११ ०५१.भ्रमणध्वनी ९८५०३८४२३२. ईमेल : gazalniphadkar@com
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 03/05/2007 - 11:59
Permalink
गझल मस्त आहे
गझल मस्तच आहे. काफियेही नवे-नवे आहेत.
विसुनाना
सोम, 07/05/2007 - 00:54
Permalink
वा!
छान गझल.
कसेबसे जगतात कवी हे
कुबेर झाले सारे गवई
-क्या बात है!
अनंत ढवळे
गुरु, 03/05/2007 - 21:37
Permalink
सुंदर च
ही एक नितांत सुंदर गझल आहे, विशेषतः ,पहिले चार शेर. निफाडकरांच्या गझलेची भाषा साधी सोपी आणि परिणामकारक आहे.
मतला अनेक वेगवेगळ्या अर्थांकडे घेऊन जाणारा आहे.
सोनाली जोशी
शुक्र, 04/05/2007 - 00:16
Permalink
छान
गझल आवडली.
खोडसाळ प्रतिसादही आवडला.
बापू१११
रवि, 06/05/2007 - 22:56
Permalink
छान : बापू
छान : बापू दासरी
मयुरेश देशपान्दे (not verified)
बुध, 31/12/2008 - 03:56
Permalink
वा! एक्दम झकास
तुमच नाव वाचल आणी तीथच खुश झालो. मग खुश झालो ते तुमच्या गझलेमुळे.......
दशरथयादव
मंगळ, 06/01/2009 - 18:37
Permalink
कसेबसे
कसेबसे जगतात कवी हे
कुबेर झाले सारे गवई
कविता माझी दुधाप्रमाणे
गझला म्हणजे नुसती मलई
हे शेर फार आवडले
प्रसाद लिमये
बुध, 07/01/2009 - 08:49
Permalink
गरिबी
गरिबी अपुली अशीच राहो
आपण दोघे एकच दुलई
.............क्या बात है