क्ळू लागले

कळू लागले


निसटलेले  दिवस आता छळू  लागले
जीवन माझे मला  आता कळू लागले

थकून गेल्या  बघा जुनाट  वाटा
पाय पुन्हा घराकडे  वळू  लागले

खरेपणाने वागलो,  डाग ना लागला कधी
शुभ्र कपड्यातील ... मनही मळू लागले 

पावसाळा कोरडा गेला, शेती  ओसाडली
भर उन्हाळ्यात आता आभाळ गळू लागले

उमगले मला जेव्हा, मह्त्व  आयुष्याचे
वय दिवसाच्यामागे  असे पळू  लागले

कित्येक मेल  आता बालपण राहिले दूर
खुणावत तारुण्याला वार्धक्य चळू लागले

निवड्णूक  अशी लढलो, शत्रू भेदला आरपार
जिन्कण्याच्यावेळी नेमके यार पळू  लागले

दशरथ यादव

 

 

गझल: 

प्रतिसाद

प्रिय दशरथ, या रचनेत गझलेचा मंत्र आहे. कल्पना  छान आहेत. गझलेची बाराखडी पुन्हा पुन्हा वाचावी. तंत्र अवगत करावे. वृत्तात लिहिणे काही कठीण नाही. तुम्ही उत्तम गझला लिहाल. शुभेच्छा!

निसटलेले  दिवस आता छळू  लागले
जीवन माझे मला  आता कळू लागले

थकून गेल्या  बघा जुनाट  वाटा
पाय पुन्हा घराकडे  वळू  लागले

व्वा....... सुरेख कल्पना आहेत

विश्वस्तांचे म्हणणे अगदी खरे आहे. विचारांमधे खरोखरच सबस्टन्स आहे आपल्या.
खुणावत तारुण्याला वार्धक्य चळू लागले हा एक चांगला विचार आहे.
आपल्या वृत्तबद्ध गझला खरच चांगल्या होतील. प्रतीक्षा करत आहे.

मा. विश्वस्त
आपला मोलिक सल्ला आवडला.  प्रयत्न  करीन.
धन्य्वाद..........

आपल्या सूचनाबदद्ल आभारी  आहे.
--------------------
धन्यवाद..................

धारिष्ट्य वाखाणण्याजोगे आहे.

निसटलेले  दिवस आता छळू  लागले
एवढेच.