फुलांनी काय हो केले ?
नकाना पाकळ्या तुडवू फुलांनी काय हो केले ?
मुक्याने मामला मिटवू फुलांनी काय हो केले ?
गुलाबी गारवा सुटला उन्हाला बैस ल्या वेली
झळा या तापल्या अडवू फुलांनी काय हो केले ?
सुडाने जाळल्या कोणी सुगंधी गर्द या बागा
दवाने चिम्ब त्या भिजवू फुलांनी काय हो केले ?
फुलावे वाटले त्यांना गुन्हा का जाहला त्यांचा
तयांनी मंदिरे सजवू फुलांनी काय हो केले ?
फुलांचे शब्द हे झाले तयांची वेल ही फुलली
फुकाना राडही उडवू फुलांनी काय हो केले ?
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शनि, 03/01/2009 - 15:10
Permalink
वृत्त
सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
डॉ समीर अन आदरणीय पुलस्तीसाहेबांच्या सुचनेवरून आपण मोठ्या वृत्तात ही गझल केलीत यावरून आपण गझलेबाबत गंभीर आहात हे लक्षात येतेच.
ही गझल चांगली आहेच, मला व्यक्तिशः रदीफ फार आवडली, पण माझे असे मत आहे की 'फुलांनी काय हो केले' चे प्रयोजन सर्व ओळींमध्ये तितकेच खंबीर वाटत नाही. मतल्यात व चवथ्या शेरात ते मला समजले, इतर शेरात समजले नाही.
हे म्हणण्याचा मला तसा अजून काहीही अधिकार नाही, पण आपण हळूहळू चांगली प्रगती करीत आहात असे वाटते. आपल्या पुढच्या गझलेसाठी शुभेच्छा व तिची प्रतीक्षा!
जरासे स्पष्ट - स्त्रीने केलेली गझल ही कायम सामाजिक किंवा स्त्रीवादी असावी हे मला पटत नाही. जराश्या धीट किंवा खासगी विषयांवरच्या ओळी स्त्रीच्या तोंडी भाव खाऊन जातात हे येथील उदाहरणांवरून आपल्याला जाणवलेच असेल, जसे:
सन्माननीय कवयित्री जोशींची ओळ - मी चोरपावलांनी गेले पण पैंजणांनी दगा केला.
सन्माननीय कवयित्री मनीषा साधूंची ओळ - जातपात ये सब झुठ है, येते म्हंटली बाहू दे
सन्माननीय व गझल-रसिकांना भलतीच वाट पहायला लावणार्या कवयित्री चांदणी लाड यांची ओळ -'खास जागी'
कृपया असे समजू नयेत की स्त्रीने अती धीट व्हावे अशा स्वरुपाची अपेक्षा मी व्यक्त करत आहे. मी फक्त विषयांना कलाटणी देण्याचे आपण मनावर घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.
धन्यवाद!
नव्ननाथ (not verified)
शनि, 03/01/2009 - 16:14
Permalink
कविता खुपच
कविता खुपच चान आहे
अजय अनंत जोशी
शनि, 03/01/2009 - 18:49
Permalink
तुटक वाटते आहे
मतला सोडून इतर चारही शेर तुटक वाटत आहेत. तुम्हाला काय म्हणायचे आहे हे साधारण लक्षात येते. मात्र 'फुलांनी काय हो केले' याच्याशी ते जुळतंय असे नाही वाटत. असो.
पुढील गझलेसाठी शुभेच्छा!
कलोअ चूभूद्याघ्या
दशरथयादव
रवि, 04/01/2009 - 17:00
Permalink
दोन्ही शेर
दोन्ही शेर आवडले
खूप छान......
...................
गुलाबी गारवा सुटला उन्हाला बैस ल्या वेली
झळा या तापल्या अडवू फुलांनी काय हो केले ?
सुडाने जाळल्या कोणी सुगंधी गर्द या बागा
दवाने चिम्ब त्या भिजवू फुलांनी काय हो केले ?ग