गझल
खोल गम्भीर नाद
मम आत्म्याची साद
मनी मम सुन्दर जे
त्याचा तू अनुवाद
गझल म्हणू की ग़ज़ल
नको फुकाचा वाद
घे जुळवुन पण प्राण
करू नको बरबाद
कविता वाटे परी
तू कोमल परिझाद
मी जरी घन घंटा
तू तर घंटा नाद
तरल धवल हो ऊड
जगणे मजवर लाद
गझल:
प्रतिसाद
कल्पना शिन्दे (not verified)
शनि, 20/12/2008 - 10:10
Permalink
गजल
सुनेत्रा , तुमचि गजल अतिशय भावपुर्न आहे.
कल्पना शिन्दे (not verified)
शनि, 20/12/2008 - 10:10
Permalink
गजल
सुनेत्रा , तुमचि गजल अतिशय भावपुर्न आहे.
अजय अनंत जोशी
शनि, 20/12/2008 - 23:39
Permalink
ऊड??
हे 'ऊड' काय आहे?
आणखी एक घ्या...
माग तू फक्त ज्ञान..
नको फुकाची दाद
कलोअ चूभूद्याघ्या
समीर चव्हाण (not verified)
रवि, 21/12/2008 - 12:37
Permalink
प्रयत्न व्हायला हवा
गेल्या काही दिवसांत साईटवर लहान मीटरमधील (१५ मात्राखालील, माझ्यामते) गझला जरा जास्तच दिसून येताहेत. अश्या गझला लिहिण्यात धोका असा असतो की बहुतेकदा तुकबंदी होऊन बसते तसेच त्या सपाट होण्याची दाट शक्यता ही असते. म्ला वाटते मोठ्या मीटरमधे (ज्या लहान मीटरमधे नाहीत अश्या,तसेच प्रदीपजींच्या भाषेत पल्लेदार) गझला लिहायचा प्रयत्न व्हायला हवा. आपला लहान मीटरमधे लिहण्याचा कल पाहून हे सांगणे.
पुलस्ति
रवि, 21/12/2008 - 23:47
Permalink
सहमत
हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून जरी मूळ कल लहान बहरीचा असला तरी अधूनमधून मोठ्या बहरीच्या गझला / कविता प्रयत्नपूर्वक लिहाव्यात असे मला वाटते.
चू. भू. दे. घे.
रसिक (not verified)
मंगळ, 23/12/2008 - 00:18
Permalink
नम्रता!
पुलस्तीसाहेबांइतकी नम्रता खरच कुठेही बघितली नाही. सॅल्युट पुलस्ती साहेब! आपण एक उत्कृष्ट गझलकार असूनही इतके नम्रही आहात ( :- ) हे खरच स्तुत्य आहे. आय ऍम सिरियस!
मॅडम,
आपण केलेली गझल अतिशय उत्तम आहे. परंपरेने आमच्या मनात ज्या गझलेच्या व्याख्या बसलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो इतकेच!
सुनेत्रा सुभाष
बुध, 24/12/2008 - 09:57
Permalink
धन्यवाद.
आदरणीय , शिंदे, अजय, समीर, पुलस्ति,
मनापासून आभार.
अजय,
'ऊड' हे उडुन जा या अर्थाने वापरले आहे.