साय
नकोस देऊ गाय कुणाला
नात्यावरची साय कुणाला
तवा तापला भाजा पोळ्या
श्रेय कुणाचे जाय कुणाला
म्हणे अताशा देव वाटतो
कुणास कुबड्या पाय कुणाला
करती पोरे अता वाटण्या
बाप कुणाला माय कुणाला
जिंकून घे वा हार मान तू
नको ंम्हणू पण टाय कुणाला
नेत्र सुनेत्रा भरून येता
ह्रदय म्हणाले हाय कुणाला
गझल:
प्रतिसाद
रसिक (not verified)
सोम, 15/12/2008 - 15:19
Permalink
विचित्रविश्व किंवा रम्यकथा किंवा अमृत
या वरील जुन्या काळातल्या पुस्तकांमधे ही गझल छापून त्या सदराला
'प्रकाशकांच्या डुलक्या'
असे नाव द्यावे.
सौरभ आपटे
सोम, 15/12/2008 - 18:13
Permalink
अभिनंदन
आपले नाव आता दशदिशांना दुमदुमत आहे. 'गझलकार' म्हणुन! अभिनंदन!
इतकी उत्कृष्ट गझल खरच आजपर्यंत आम्ही वाचली नव्हती.
भटांच्या एका शेरावरून मला आत्ताच एक स्वतःचा असा शेर सुचला.
'वाचणेही अघोरी कला यार हो'.
सुनेत्रा सुभाष
मंगळ, 16/12/2008 - 09:47
Permalink
सुनेत्रा सुभाष
आ.रसिक,
आ.सौरभ,
मनापासून आभार.
भूषण कटककर
बुध, 17/12/2008 - 10:18
Permalink
इन्ग्लीश!
सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
कुबड्या व तवा तापला हे शेर आवडले. मुले आईवडिलांची वाटणी करतात हे दुर्दैवी सत्य आपण चांगले मांडले आहेत. मला हिंदी चित्रपट 'बागबान'ची आठवण झाली.
मी स्वतः गझलेमधे इन्ग्लीश शब्द वापरण्याच्या विरुद्ध आहे, जसे 'टाय' कुणाला. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मला मतला समजला नाही, पण नेहमीप्रमाणे तो माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे.
चांगली गझल!
धन्यवाद!
अजय अनंत जोशी
बुध, 17/12/2008 - 22:05
Permalink
हे पण घ्या..
करून बडबड व्यर्थ फुकाची
मिळे दक्षिणा-चाय कुणाला (हिंदी चालेल असे वाटते.)
बाकी शेर - पद्धत उत्तम.
कलोअ चूभूद्याघ्या
कल्पना शिन्दे (not verified)
शनि, 20/12/2008 - 10:53
Permalink
साय
सुनेत्रा,
'नेत्र सुनेत्रा भरुन येता........
अप्रतिम! सत्य शब्दान्कित केलेत!