भणंग २


समाधान झाले सकाळी सकाळी
तुला भान झाले सकाळी सकाळी

चवीला तुझे ओठ ओठात घेता
सुरापान झाले सकाळी सकाळी

मिठी सोडता पाहिले एकमेका
कसे ध्यान झाले सकाळी सकाळी

नवी जान आल्यापरी रक्त सारे
गतीमान झाले सकाळी सकाळी

नभातून यक्षास उ:शाप आला
परीदान झाले सकाळी सकाळी

म्हणाली मला रात की शेवटाला
तुझे छान झाले सकाळी सकाळी



गझल: 

प्रतिसाद

नवी जान आल्यापरी रक्त सारे
गतीमान झाले सकाळी सकाळी

म्हणाली मला रात की शेवटाला
तुझे छान झाले सकाळी सकाळी..
मस्त शेर आहेत.

मतल्यातली दुसरी ओळ बदलता आली  तर पहा.

काय चमत्कारीराव?
बरेच दिवसांनी आली गझल आपली, अन तीही एकदम रोमँटिक!
काय चाललय काय?
गझल आवडली.

नवी जान ... छान.
कलोअ चूभूद्याघ्या

म्ह्णजे असं की   एक यमक किंवा अंत्ययमक घ्यायचा..मग याच्या अवती भवती काय काय लिहिता येईल ते बघायचं   : )

आव़डली गझल.

समाधान झाले सकाळी सकाळी
तुला भान झाले सकाळी सकाळी

कवी चमत्कारींच्याच पद्धतीने विचारायचे झाले तर दोन ओळींचा संबंध आहे की नाही हे काही कळत नाही. प्रेयसीचे भान सकाळी सकाळी गेले तर समाधान होणारे आमच्या ऐकीवात होते. आता भान झाले तरीही समाधान होणारे आहेत हे पाहून प्रेयसीबद्दल कवीच्या मनात काय असावे याचा नेमका अंदाज येत नाही. बर समाधान कवीचे झाले आहे अन भान प्रेयसीचे गेले आहे असे आहे की दोन्ही प्रेयसीचेच झाले आहे तेही समजत नाही. म्हणजे भानावर आल्यामुळे प्रेयसीचे समाधान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यावेळी कवीचे काय झाले हे स्पष्ट होत नाहीये.

चवीला तुझे ओठ ओठात घेता
सुरापान झाले सकाळी सकाळी

पहिले ५०% अनुभव सुरुवातीच्या काळात जमेस असू शकले तरी दुसरे ५०% अनुभव आमच्या जमेस नाहीयेत. िशवाय, हे समजत नाही की दुसर्‍या ओळीत कवी समाधान व्यक्त करतोय की पहिल्या? ( म्हणजे काही मद्यपी फुकटची मिळाली की खूष होतात तसा आनंद आहे की मद्याला पर्याय उपलब्ध असल्याचे जाणवले याचा आनंद आहे? ) आणखीन एक ट्विस्ट कवीने असा टाकला आहे की सुरापान 'सकाळी सकाळी' झाल्याचाही आनंद असू शकेल. म्हणजे सारखी सारखी रात्रीच काय घ्यायची वगैरे असे प्रश्न असतील तर त्याला एक सुलभ ( सुलभ हे आम्ही गृहीत धरले आहे ) पर्याय उपलब्ध आहे याचाही आनंद असू शकतो. 
या शेराचा अर्थच आम्हाला समजत नाहीये.
सकाळी उठल्यावर सर्वसामान्य लोक दात घासतात. त्याने तोंडाची चव चांगली होते. इथे कवी जगन्मान्य सिध्दांत झिडकारून वेगळ्याच मार्गाने चव सुधारून घेण्याच्या प्रयत्नात दिसतो. म्हणजे चव, सुरापान, सकाळी सकाळी यातील कोणची गोष्ट कवीला भावली असावी हे तर्क करायला आमचे अनुभवविश्व तोकडे पडत आहे.

मिठी सोडता पाहिले एकमेका
कसे ध्यान झाले सकाळी सकाळी

व्वाह! एकदम वातावरण निर्मीती. हा शेर खरच चांगला आहे. 
'गझलियत' या विषयावर व्याख्यान देणारे सवंगतेकडे वळू नयेत, असे आमचे मत आहे.

नवी जान आल्यापरी रक्त सारे
गतीमान झाले सकाळी सकाळी

सवंगता पुन्हा पुन्हा येत आहे. म्हणजे संपूर्ण गझलच तशी आहे.

नभातून यक्षास उ:शाप आला
परीदान झाले सकाळी सकाळी

कवी अनंत ढवळे  यांनी त्यांच्या प्रतिसादात या शेराचे वर्णन सुरेख केलेच आहे. त्यामुळे त्यावर आम्ही वेळ घालवत नाही. 

म्हणाली मला रात की शेवटाला
तुझे छान झाले सकाळी सकाळी

हां! आता या शेराचे बघा काय काय आहे!
कवीशी रात्र बोलते. रात्रीला काही 'बोलू का?' असा प्रश्न विचारण्याची गरज नाहीये. ते इथे विचारावे लागत असेल. त्यात परत रात्र त्याला म्हणते की ,तुझे चांगले झाले की रे लेकाच्या! म्हणजे रात्रीच्या मनात कवीचे काहीतरी वेगळेच व्हावे असे होते की काय?  या सगळ्यात त्या टुथपेस्टचे काय झाले ते काही कळत नाही. तिला नुसतेच भान आले असावे.

थांबून केलेली गझल दर्जेदार होते या सर्वमान्य कल्पनेला कवीने जोरदार तडाखा दिलेला आहे.

गझलमधे इतके उघड वर्णन नसणे हे गझलच्या भवितव्यासाठी जरुरीचे आहे.