डोळे जेव्हा भिडले होते

डोळे जेव्हा भिडले होते
ठोके तेव्हा चुकले होते

 

गिरकी घेता स्वतःभोवती
विश्वचि अवघे फिरले होते

 

ऐकू आली कुजबुज कानी
प्रेम तयांचे जडले होते

 

जमले नाही बोलायाचे
शब्दांवाचुन कळले होते

 

तरंग 'मधुरा' पाण्यावरती
मंद चांदणे झरले होते

गझल: 

प्रतिसाद

गिरकी घेता स्वतःभोवती
विश्वचि अवघे फिरले होते

हे छान. बाकी ठीक. शुभेच्छा!
कलोअ चूभूद्याघ्या

सन्माननीय मधुरा,
गझल चांगली केलीत.
अभिनंदन!

थोडक्यात सुरेख.

गिरकी घेता स्वतःभोवती
विश्वचि अवघे फिरले होते

डोळे जेव्हा भिडले होते
ठोके तेव्हा चुकले होते

 

गिरकी घेता स्वतःभोवती
विश्वचि अवघे फिरले होते

छान..

डोळे जेव्हा भिडले होते
ठोके तेव्हा चुकले होते
जमले नाही बोलायाचे
शब्दांवाचुन कळले होते
हे दोन शेर फार छान!

सुंदर........सुंदर........
गिरकी घेता स्वतःभोवती
विश्वचि अवघे फिरले होते