पाचोळा




वा! इथेही पाव आहे
बाटण्याला वाव आहे!


रान सरले, जपुन आता
माणसांचा गाव आहे


झापडे डोळ्यांस लावा
धाव मग भरधाव आहे!


हारलेले डाव सारे
खेळण्याचा आव आहे


हे नको तेही नको मज
ही विलक्षण हाव आहे


शुष्क पाचोळा नसे हा
वादळाचा घाव आहे


-- पुलस्ति


गझल: 

प्रतिसाद

प्रतिक्रियांसाठी सर्वांचे आभार. सूचना व सल्ले लक्षात ठेऊन अधिक सकस गझल लिहायचा प्रयत्न करीन..

रान सरले, जपुन आता
माणसांचा गाव आहे

झापडे डोळ्यांस लावा
धाव मग भरधाव आहे!

या खजान्यात खोल जाइल तसे मनास भावणार्‍या बर्‍याच रचना सापडताहेत.
गझलांचा जन्मदिवस जुना असला तरी माझ्या द्रुष्टीने त्या नवीन आहेत त्यामुळे प्रतिसाद देत आहे.