ओळ्खीचे
Posted by कौतुक शिरोडकर on Saturday, 22 November 2008
देऊन गेले झळा ओळ्खीचे
कापून गेले गळा ओळ्खीचे
भिरकावला दगड गर्दीत जेव्हा
ये , रक्त ये भळ्भळा ओळ्खीचे
आक्रोशतो भ्रूण वाटेवरी तो (वृत्तात आहे का ?)
फेकून गेले लळा ओळखीचे
वार्यासही राख सांगे धरूनी
जाळून गेले मळा ओळ्खीचे
या, गाव साक्षर करू, बोललो अन
मोडून गेले फळा ओळ्खीचे
हे दु:ख आहे अहिल्ये अजून
बनवून गेले शिळा ओळ्खीचे
गझल:
प्रतिसाद
कौतुक शिरोडकर
शनि, 22/11/2008 - 11:50
Permalink
'जोडाक्षरा
'जोडाक्षरांमुळे होणारा वृत्ताचा घोळ' ह्यातही आहे असंं सारखं वाटतेय. कृपया चुका सांगाव्या.
भूषण कटककर
बुध, 26/11/2008 - 12:08
Permalink
उत्तम विचार!
कौतूकजी,
चांगली गझला आहे. आवडली.
शुभेच्छा!
ज्ञानेश.
बुध, 26/11/2008 - 15:01
Permalink
वेल..
श्री. कौतुक,
आपल्या इतर गझलांच्या तुलनेत ही गझल जरा फसली आहे, असे वाटते. 'ओळखीचे' या रदीफास सर्व शेर न्याय देत नाहीयेत. बाकी जाणकार लोक सांगतीलच.
'जोडाक्षरांमुळे होणारा वृत्ताचा घोळ' याबाबत इतकेच म्हणावेसे वाटते, की आपण गझल लिहीत असतांना मुद्दाम ठरवून वृत्ताच्या मागे लागू नये. एकदा मनात गझलेची 'जमीन' निश्चित झाली म्हणजे पुढचे शेर आपोआपच वृत्तात येतात, असा माझा अनुभव आहे.
फार तर गझल पुर्ण झाल्यावर एकदा ठेक्यात वाचून पहावी. वृत्त चुकले असेल, तर त्या जागी आपल्यालाच अडखळल्यासारखे वाटते. (अक्षरगण वृत्तात)
शुभेच्छा.