गझल




फोडुनी पाझर काळ्या खडकापार गझल
प्रत्ययी दाखवते डोहे निळेशार गझल

पारदर्शी पुतळीच्या नयनी भाव गहन-
चित्तचोरी करते सुंदर सकवार गझल

शुद्ध अन् कोमल सारे स्वर जोखून तरळ
आज केदार उद्या गाईन मल्हार गझल

वाट चोखाळत जाईन प्रकाशी अविरत
आडमार्गी न कधी ठोकर खाणार गझल

आजचे हार-तुरे-कौतुक टाळून सहज-
शिंपते बाग भविष्यातिल गुलजार गझल

एक गंधाळ कळ्यांचा गजरा घे चटकन्
होतसे वाट घरी पाहुन बेजार गझल

'ओठसंपन्न' तुम्ही गा चलतीचेच कवन
वंचितांची धग कंठातुन गाणार गझल

--शिवाजी जवरे

प्रतिसाद

फोडुनी पाझर काळ्या खडकापार गझल
प्रत्ययी दाखवते डोह निळेशार गझल
वा...वा...छान.